शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

युवराज पाटील यांची सुनावणी १ जूनला

By admin | Updated: May 22, 2017 17:22 IST

शेतकरी संघ संचालक : भूविकास बॅँक थकबाकी प्रकरण

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २२ : शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्यासह तीन संचालकांच्या अपात्रतेबाबत १ जून रोजी सुनावणी होणार आहे. जिल्हा उपनिबंधक सोमवारी उपस्थित नसल्याने याबाबतची सुनावणी होऊ शकली नाही. भूविकास बॅँकेच्या थकबाकीबाबत संघाचे माजी संचालक सुरेश देसाई यांनी तक्रार दाखल केली आहे. शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी भूविकास बॅँकेच्या कागल शाखेतून पाईपलाईन व वीजपंप खरेदीसाठी २७ मार्च २०१२ ला १५ लाखांचे कर्ज घेतले आहे. हे कर्ज त्यांच्यासह त्यांचे सूपूत्र मानसिंग पाटील यांच्या नावावर थकीत असून २० लाख ८३ हजार ९१९ रूपयांपर्यत थकबाकी गेली आहे. मानसिंग पाटील (तारळे , ता. राधानगरी) यांनी १९ जून २०१२ ला म्हैस खरेदीसाठी राधानगरी शाखेतून १ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले त्यातील १ लाख ६२ हजार ३५१ रुपये कर्ज थकित आहे. मारुती पाटील (दिगवडे, ता. पन्हाळा) यांनी म्हैस खरेदीसाठी बँकेच्या कळे शाखेतून ३० मार्च २०१२ ला एक लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले, त्यातील ६५ हजार ३८ रुपये थकित आहेत. याविरोधात सुरेश देसाई यांनी जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे यांच्याकडे तक्रार केली आहे. सहकार संस्था कलम ७३ (सी. ए) अन्वये संचालक पद रद्द का करू नये, अशी नोटीसा जिल्हा उपनिबंधकांनी लागू केल्या असून यावर सोमवारी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. तीन संचालकांच्या वतीने सोमवारी अ‍ॅड. दत्ता राणे उपस्थित राहिले. पण जिल्हा उपनिबंधक काकडे हे आयुक्तांच्या बैठकीसाठी पुण्याला गेल्याने सुनावणी झाली नाही. पण अ‍ॅड. राणे यांनी तक्रारीची नक्कल सहकार विभागाकडे मागितली आहे. पुढील सुनावणी १ जून रोजी होणार आहे. थर्ड पार्टीसाठी देसार्इंचा अर्ज या प्रकरणात आपण तक्रारदार असून याबाबतची कागदपत्रे आपल्याकडे आहेत. त्यामुळे सुनावणी वेळी थर्ड पार्टी म्हणून आपणालाही नोटीस काढावी, अशी मागणी सुरेश देसाई यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. शिक्षक बॅँकेची सोमवारी सुनावणीप्राथमिक शिक्षक बॅँक नुकसान प्रकरणी आजी-माजी संचालकांना नोटीसा लागू केल्या आहेत. यावर सोमवारी (दि. २९) म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.