याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहापूर येथे विनायक हायस्कूलच्या मागे एक युवक रक्तबंबाळ स्थितीत पडल्याचे आढळल्याने तेथून निघालेल्या व्यक्तीने शहापूर पोलिसांना कळविले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत. हालचाली सुरू केल्या. मृतदेहाची पाहणी केली असता त्याला कोयत्याने डोक्यात, तोंडावर, पायावर व पाठीवर वार करून खून केला असल्याचे आढळले. तसेच जवळच असलेल्या मैदानात कोयताही सापडला. तोंडावर वार असल्याने लवकर त्याची ओळख पटत नव्हती. दरम्यान, घटनास्थळी सापडलेल्या मोटारसायकलीवरून पोलिसांनी माहिती काढली असता, शुभम याने मित्र विवेक विलास नेजे (रा जवाहरनगर) याची मोटारसायकल (एमएच ०९ ईए ६१६४) घेऊन कामावरून गेला असल्याचे समजले. शुभम याचा नाजूक प्रकरणातून खून झाल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती; परंतु रात्री उशिरापर्यंत कारण स्पष्ट झाले नव्हते. पोलिसांची शोधमोहीम रात्री सुरू होती. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश निकम यांनी पाहणी केली.
चौकट
एका महिन्यात तीन खून
६ जानेवारी रोजी शहापूर येथील एका चाळीस वर्षीय अज्ञाताच्या डोक्यात वर्मी घाव घालून त्याचा खून करून मृतदेह खाणीमध्ये टाकला. तसेच २४ जानेवारीला कबनूर (ता. हातकणंगले) येथील संदीप माघाडे याचा राजकीय वादातून खून करण्यात आला; तर आता शहापूरमध्ये शुभम याचा खून झाला. त्यामुळे एका महिन्यात शहरात तीन खून झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.