शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

युवा शाहू, ग्रंथ पुरस्कार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:41 IST

इंदूमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा राजर्षी युवा शाहू पुरस्कार व राजर्षी शाहू ग्रंथ पुरस्कार गेल्या काही वर्षांपासून बंद पडला आहे, तर सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक उपक्रमांसाठी नेमलेल्या उपसमित्या बरखास्तच झाल्या आहेत. त्यामुळे ट्रस्टच्या कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.शाहू स्मारक ...

इंदूमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा राजर्षी युवा शाहू पुरस्कार व राजर्षी शाहू ग्रंथ पुरस्कार गेल्या काही वर्षांपासून बंद पडला आहे, तर सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक उपक्रमांसाठी नेमलेल्या उपसमित्या बरखास्तच झाल्या आहेत. त्यामुळे ट्रस्टच्या कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.शाहू स्मारक ट्रस्टचे काम केवळ हॉल किंवा कलादालन भाड्याने देण्याचे नाही, तर कलासाहित्य संस्कृतीच्या चळवळीत उपक्रमशीलतेने पुढाकार घेणे हा उद्देश आहे. तशी ट्रस्टची स्वतंत्र घटना आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ट्रस्टच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथमहोत्सव, परिसंवाद, कविसंमेलन, चित्रपट महोत्सव, चर्चासत्र, कलाप्रदर्शने, संमेलने असे विविधांगी कार्यक्रम घेतले जात होते. या क्षेत्रांमध्ये स्वत:चे विशेष स्थान निर्माण केलेल्या युवा पिढीला प्रोत्साहन मिळावे यासाठी युवा शाहू पुरस्कार दिला जात होता. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, लेखिका सोनाली नवांगुळ यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते, तर ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. आ. ह. साळुंखे यांना राजर्षी शाहू ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची बदली झाल्यानंतर हे पुरस्कार बंद पडले.देशमुखांच्या काळात कार्यक्रमांच्या संयोजनासाठी उपसमित्या नेमण्यात आल्या होत्या, त्यात प्राचार्य अजेय दळवी, विजय टिपुगडे, मंजुश्री पवार, आझाद नायकवडी, सागर बगाडे यांच्यासह साहित्य कला क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. या उपसमित्यांमुळे उपक्रमांचे संयोजन आणि नियोजन केले जात होते. त्या निमित्ताने विचारांची देवाणघेवाण व्हायची; पण या समित्याही नंतर बंद पडल्या.जिल्हा प्रशासनाचे ट्रस्टच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने कोणीही या, काहीही करा अशी स्थिती आहे. शिवाय कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत योगदान न दिलेल्या ट्रस्टच्या एका कर्मचाऱ्याला ढीगभर पुरस्कार मिळतातच कसे, हे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येथील गैरकारभार कळाल्यानंतर काही सामाजिक संघटनांनी यापूर्वीच जिल्हाधिकाºयांना निवेदनाद्वारे कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.कमर्शियल वापरशाहू स्मारक भवनचे मोठे कलादालन काही महिन्यांसाठी कपड्यांच्या सेलसाठी वापरले जाते. वरचा हॉल खादी व कॉटन सेलला किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सेलला दिला जातो. ट्रस्टला अडचणी आहेत; त्यामुळे एकवेळ पुस्तकांचा सेल समजून घेता येईल; पण कपड्यांचे व वस्तूंचे सेल लावणे या वास्तूसाठी योग्य नाही, असे या क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे.