शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपीच्या हल्ल्यात युवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील राजेंद्र नगरातील महादेव मंदिरानजीक विसाव्यासाठी बसलेल्या युवकांवर मद्यपीने हल्ला केला. मद्यपीने डोक्यात दगड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : येथील राजेंद्र नगरातील महादेव मंदिरानजीक विसाव्यासाठी बसलेल्या युवकांवर मद्यपीने हल्ला केला. मद्यपीने डोक्यात दगड घातल्याने तानाजी बाबू मोरे (३२, रा. इंगळी, ता. हातकणंगले) हे जखमी झाले. याप्रकरणी मारुती सोनवणे (पूर्ण नाव, पत्ता नाही) याच्यावर राजारामपूरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. सोमवारी सायंकाळी मोरे हे पत्नी मनीषासोबत विसाव्यासाठी मंदिरानजीक बसले असताना संशयित सोनवणे दारूच्या नशेत तेथे आला. त्याने शेजारी पडलेला दगड उचलून तानाजी मोरे यांच्या डोक्यात घातला. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना पत्नीने खासगी रुग्णालयात दाखल केले.

मद्यपीकडून मारहाण

कोल्हापूर : येथील मंगळवार पेठेत एका बिअरबारमध्ये किरकोळ कारणावरून एका अनोळखी व्यक्तीने दारूचा ग्लास मारल्याने युवक जखमी झाला. अमित सदाशिव गवळी (३८ रा. माळी गल्ली, मंगळवार पेठ) असे जखमीचे नाव आहे. बिअरबारमध्ये ज्येष्ठ नागरिकाची चेष्टा करणाऱ्या मद्यपीला गवळी याने जाब विचारला, त्या रागातून अनोळखी मद्यपीने गवळी यांना शिवीगाळ करीत दारूचा ग्लास त्यांच्या कपाळावर व डोळ्यावर मारून जखमी केले. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत तक्रार दाखल झाली.

दुचाकी चोरी

कोल्हापूर : येथील मेरीवेदर मैदानाशेजारी वारणा कॉलनीत उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. अभिजीत अरविंद माने (बागल चौक, शाहुमील) याने या दुचाकी चोरीची तक्रार शाहुपूरी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.