शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

वस्तूंच्या संग्रहातून तरुण जपतोय इतिहासाच्यापाऊलखुणा

By admin | Updated: February 10, 2015 23:52 IST

फिरते संग्रहालय : बहिरेवाडीच्या अरविंद भोसलेचा उपक्रम; वर्षभरात भरवली दहा प्रदर्शने

दिलीप चरणे -नवे पारगाव -बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील अरविंद भोसले या युवकाने ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद जोपासला आहे. नागरिकांना इतिहासाचे महत्त्व पटवून देऊन इतिहासावरची विश्वासार्हता वाढविण्यासाठी त्याने संग्रही असणाऱ्या ऐतिहासिक वस्तूंचे फिरते प्रदर्शन भरविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. वर्षभरात त्याने दहा प्रदर्शने भरवली आहेत.वारणा खोऱ्यातील बहिरेवाडी सारख्या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील अरविंद भोसले याचे शेतातील कामे करत महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहे. वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याने अनेक ऐतिहासिक ग्रंथ वाचले. इतिहासाच्या प्रा. डॉ. मंजुश्री पवार यांच्याकडून मार्गदर्शन व प्रेरणा मिळत गेली आणि इतिहासाची आवड वाढत गेली. यातूनच डॉ. मंजुश्री पवार यांच्या समवेत त्याने विविध किल्ले, जुने वाडे, वस्तुसंग्रहालय, पुराभिलेखागार याची पाहणी केली. इतिहासाच्या पाऊलखुणांचे अवलोकन केले. यातून इतिहासाची गोडी वृद्धिंगत झाल्याने त्याने पुरातन वस्तू शोधण्यासाठी व जतन करण्यासाठी अनेक गडकोट, किल्ल्यांना भेटी दिल्या.या शोधमोहिमेत बहिणीच्या शेतामध्ये त्याला एक शिवकालीन व दोन मुघलकालीन नाणी सापडली. त्यानंतर ऐतिहासिक वस्तू जतन करण्याचा कल वाढत गेला. लोकांना इतिहासाचे महत्त्व समजावे, त्यांचा विश्वास बसावा याकरिता त्याने वस्तू, नाणी, शस्त्रे, कागदपत्रे, जुन्या लाकडी वस्तू, महात्मा गांधी युगातील चरखा, डाव, रवी, राजर्षी शाहूकालीन स्टॅम्स, धान्य मोजण्याचा १९१० सालचा शेर, इत्यादी वस्तू संग्रहित केल्या. आजमितीस त्याच्याकडे आठशेहून अधिक नाणी आहेत. शिवकालीन, मुघलकालीन, ब्रिटिशकालीन विदेशी चलन, शस्त्रे, शिवकालीन तलवार, भाला, ऐतिहासिक कागदपत्रे, इत्यादींचा ऐतिहासिक खजिना त्याच्या संग्रहात आहे. ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू यांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने अरविंद प्रबोधनाचे काम करीत आहे. ऐतिहासिक वस्तू संग्रह करताना जनतेतून त्याला चांगले सहकार्य लाभले. तो शाळा, हायस्कूल, महाविद्यालयात हे फिरते प्रदर्शन विनामूल्य भरवत आहे. त्याला या कार्यासाठी प्रा. डॉ. मंजुश्री पवार, पुराभिलेख कार्यालयाचे सहायक संचालक गणेश खोडके यांचे सहकार्य लाभत आहे.