शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात युवा महोत्सवाचा जल्लोष

By admin | Updated: October 1, 2016 00:40 IST

शानदार उद्घाटन : युवा महोत्सवातून तरुणाईला विधायक दिशा : डी. आर. मोरे

आजरा : बहुतांशी महाविद्यालयांची स्नेहसंमेलने बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. एकूण लोकसंख्येमध्ये सर्वाधिक तरुण लोकसंख्या आहे, अशी ओळख असणाऱ्या युवा शक्तीला विधायक दिशेने पुढे नेण्याचे काम युवा महोत्सवातून केले जात आहे, असे प्रतिपादन ‘बीसीयूडी’चे संचालक (शिवाजी विद्यापीठ) डॉ. डी. आर. मोरे यांनी केले.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व आजरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३६ व्या कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी प्राचार्य डॉ. एम. एल. होनगेकर म्हणाले, केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा कलेची जोपासना करणेही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मिळाल्यास विद्यार्थी यशाच्या अत्युच्य शिखरावर पोहोचू शकतो, हे अनेक व्यक्तींनी दाखवून दिले आहे.डॉ. मोरे म्हणाले, नॅक कमिटीच्या परीक्षणानंतर युवा महोत्सवाचे यजमानपद घेण्यासाठी अलीकडे बरीच महाविद्यालये उत्सुक असतात. परंतु, अनेक कसोटीवर महाविद्यालयांचा कस लावून यमजानपद दिले जाते. यामुळेच आजरा महाविद्यालयास हे यजमानपद मिळाले आहे.सिने अभिनेते संतोष शिंदे म्हणाले, युवा महोत्सवातूनच आपली जडणघडण झाली. भविष्यातील कलाकार घडविण्याचे काम युवा महोत्सव करीत आहेत. व्यासपीठ गाजविण्यासाठी येथे मिळणारा आत्मविश्वास आयुष्यभर उपयोगी पडतो. अध्यक्षीय भाषणात जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, युवकांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या कामात आपणही खारीचा वाटा उचलला असून, नियोजनात कोणतीही उणीव राहणार नाही. परीक्षकांनीही योग्य तो न्याय देऊन स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे. यावेळी डॉ. आर. व्ही. गुरव यांनीही मार्गदर्शन केले.उद्घाटन समारंभास डॉ. अनिल देशपांडे, श्रीमती अन्नपूर्णादेवी चराटी, अजित चराटी, एम. एल. चौगुले, विलास नाईक, डॉ. दीपक सातोस्कर, विजयकुमार पाटील, दिनेश कुरुणकर, रमेश कुरणकर, प्राचार्य युवराज गोंडे, डॉ. पी. एम. पाटील, मारुती मोरे, प्राचार्य मंगलकुमार पाटील, आय. के. पाटील, व्ही. एम. पाटील, पोलिस निरीक्षक रवींद्र कदम, स्पर्धक विद्यार्थी, मार्गदर्शक उपस्थित होते. डॉ. आनंद बल्लाळ यांनी आभार, प्रा. रमेश चव्हाण व डॉ. अशोक बाचूळकर यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, स्पर्धेत उत्तूर येथील डॉ. जे. पी. नाईक महाविद्यालयाच्या संघाने लोकनृत्यावर सर्वांना डोलायला लावले. तर हातकणंगले येथील अण्णा डांगे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लघुनाटिका सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. (प्रतिनिधी)