नीलेश निकम याचे शिक्षण बारावी पूर्ण झाले असून, त्याने नुकतेच न्यू कॉलेजमध्ये प्रथम वर्गसाठी प्रवेश घेतला होता. तो ॲड. धनाजी निकम यांचा तीन नंबरचा मुलगा होय. त्यांच्या जुना वाशीनाका येथील घराचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्यासाठी त्यांनी संभाजीनगरात भाड्याने फ्लॅट घेतला होता. रविवारी सायंकाळी वडील बाहेर असतानाच आई व त्याची बहीण हे मंगळवार पेठेतील नातेवाइकांकडे गेेले होते. त्याचा मोठा भाऊ हा घरी आला, त्यावेळी फ्लॅट बंद आढळल्याने त्याने खिडकीची काच फोडून पाहिले असता नीलेशने बेडरूममध्ये छताच्या पंख्याला साडीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्याला तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले; पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST