शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

तुमचा टाटा, तर आमचा बाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:47 IST

मी व्यवसायाने एक फेरीवाला; त्यामुळे जगण्याची लढाई रस्त्यावरूनच सुरू झालेली. फेरीवाल्यांच्या हक्कांसाठी लढता-लढता कार्यकर्ता बनलो. निवडणुकीत कार्यकर्त्यांना भलताच मान ...

मी व्यवसायाने एक फेरीवाला; त्यामुळे जगण्याची लढाई रस्त्यावरूनच सुरू झालेली. फेरीवाल्यांच्या हक्कांसाठी लढता-लढता कार्यकर्ता बनलो. निवडणुकीत कार्यकर्त्यांना भलताच मान असतो तसा तो आमच्या उमेदीच्या काळातही मिळाला. थोरा-मोठ्यांची भाषणं ऐकणे आणि त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणणे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे कर्तव्य असायचे; त्यामुळे व्यक्तिमत्त्वसुद्धा तसेच घडत गेले. एकनिष्ठ, प्रामाणिक, स्वाभिमानी, तत्त्वाशी बांधील या गोष्टी कार्यकर्ता म्हणून आमच्यात भिनल्या, त्या अगदी तरुणवयात. आजही एखादी भूमिका निश्चित केली, की त्यात बदल नाही. मला मतदानाचा अधिकार नसलेल्या वयापासून मी प्रचारात सक्रिय असणारा कार्यकर्ता. निवडणुकीत चौकाचौकांत मंडप, बूथ घालून स्पीकर लाऊन प्रचार करण्यात पुढाकार असायचा. गल्ली-बोळांत प्रचारफेरी, सायकल फेरी काढायची. मोठी माणसं खिशातील पैसे घालून चहा पाजायचे. पाहुणचार काय तो एवढाच! यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, श्रीपाद डांगे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांची बिंदू चौकात भाषणे व्हायची. नावं ऐकून लोक सभा ऐकायला यायचे. आतासारख्या गाड्या पाठवायला लागत नव्हत्या. भाषणातून टीका व्हायची; पण ती वैचारिक पातळीवर होत असे. वैयक्तिक पातळीवर कोणी बोलत नसायचे. कोणाचे चारित्र्यहनन होईल, असे बोलत नसत. लोक भाषणे ऐकायचे आणि मनाला पटेल त्याप्रमाणे मतदान करायचे. राग, द्वेष कोणाच्या मनात राहायचा नाही. कोल्हापूर पुरोगामी, कष्टकरी समाजाचे शहर असल्याने येथे सुरुवातीला कॉँग्रेसचे चालत नव्हते. कॉँग्रेसविरुद्ध प्रचार करताना आम्ही कार्यकर्ते म्हणायचो ... ‘तुमच्या हातात टाटा, तर आमच्या हातात बाटा’! हा पंच एकदम लोकप्रिय. बाटा ही एक कंपनी, ती कंपनी चप्पल बनवायची; त्यामुळे म्हटले तर टीका एकदम खोलवर असायची; परंतु प्रतिस्पर्धीसुद्धा ती तितक्याच मोठ्या मनाने झेलायचे. प्रचारसभांतील भाषणं ऐकायला खूप बरं वाटायचं. लोकही प्रोत्साहन द्यायचे. बिंदू चौक पूर्ण भरलेला असायचा. आतासारख्या विविध भागांत सभा होत नव्हत्या. ज्या काही व्हायच्या त्या बिंदू चौकातच! अशा सभांतील वैचारिक भाषणांतून आमच्यासारखे कार्यकर्ते घडले. पैशांपुढे न झुकणारे, निष्ठेचा बाजार न करणारे. स्वाभिमान जपणारे.महंमद शरीफ शेख,अध्यक्ष, असंघटित कामगार संघटना