शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

महिलांसह तरुणींचे जीवन असुरक्षित

By admin | Updated: September 5, 2014 00:34 IST

शहरात रोडरोमिओंचा उच्छाद : प्रतिकार करणाऱ्यांंवरच हल्ले; पोलीस मूग गिळून गप्प

एकनाथ पाटील -कोल्हापूर --चेन स्नॅचरच्या भीतीने महिला, तरुणींचे जीवन असुरक्षित असताना आता नवीन भयावह संकटांचा त्यांना सामना करावा लागत आहे. शहरातील कॉलेज, बसस्टॉप, आॅफिस, आदी परिसरात तरुणींसह महिलांच्या छेडछाडीचे प्रकार दिवसें-दिवस वाढत आहेत. दिवसा दुचाकीवरून घरापर्यंत पाठलाग करून तरुणींच्या मनावर दडपणाचा प्रयत्न होत आहे. त्यांना प्रतिकार करणाऱ्यांंवर जीवघेणा हल्ला केला जात आहे. कायदा व्यवस्था निष्क्रिय बनली. न्यायव्यवस्थेमध्ये दाद मिळेलच याचा विश्वास नसल्याने त्या तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. रोडरोमिआेंच्या उच्छादाने शहरातील पावित्र्य नष्ट होत आहे. पोलीस मात्र बघ्याची भूमिका बजावित असल्याचे भयावह चित्र शहरात दिसते. शहरात दिवसा-ढवळ्या चेन स्नॅचरकडून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारण्याचे प्रकार वाढत असताना दुसरीकडे रोडरोमिओंचा त्रास पाचविला पूजला आहे. राजारामपुरी येथील सायबर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीला एक सराईत गुंडाला तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तरुणीच्या समोरच त्या गुंडाची पोलीस ठाण्यात धुलाई केली. त्यानंतर श्रीमती सिंग व उपअधीक्षक वैशाली माने, महाविद्यालयावरच रोडरोमिओंची धरपकड करत चोप दिला. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही केली. अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी महिला व तरुणींसाठी महिला हेल्पलाईन सुरू केली. परंतु या पथकाचा धाक तरुणांच्या मनावर पडलेला नाही. बेफामपणे दुचाकी रस्त्यावर फिरवीत ते तरुणींसह महिलांचा पाठलाग करताना भयावह चित्र लोकांना दिसतेय. त्यांना रोखणाऱ्यावरच हल्ले करायलाही ते मागे पुढे बघत नाहीत. पंधरा दिवसांपूर्वी विवेकानंद कॉलेजमधील विद्यार्थिनीचा कळंब्यातील एका तरुणाने तिचा चक्क हात पकडून जबरदस्तीने गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. उमा टॉकीज चौकात महिलेची गाडी अडवून तरुणाने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटना शाहूपुरी व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंद आहेत. पण त्यांना त्यांना समज देऊन सोडून देतात. धाक न राहिल्याने रोमिओंचे पुन्हा बेशिस्त वर्तन करू लागले आहेत. मनोबल वाढविण्याची गरज रोडरोमिओंच्या त्रासाने अनेक मुलींनी शाळा-कॉलेजलाच जाणे बंद केले. आज छेडछाड होऊनही एकही मुलगी तक्रार देण्यास पुढे येत नाही. त्यासाठी पोलीस प्रशासनाने मुलींचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. - वर्षा संकपाळ (गृहिणी)तक्रारपेटीला वाली नाहीमहाविद्यालयात लेडीज रूममध्ये तक्रार पेट्या बसविल्या आहेत. तरुणींनी अगदी बिनधास्तपणे छेड काढणाऱ्या तरुणाचे नाव, फोन व दुचाकी नंबर लिहून चिठ्ठी तक्रारपेटीत टाकावी, अशी सूचना पोलीस व महाविद्यालय प्रशासनाकडून केली आहे. पंधरा दिवसांतून एकदा दोन पोलीस महाविद्यालयात जाऊन तक्रार पेटी उघडतात. परंतु या पेट्या उघडण्यास पोलीस जात नसल्याचा तक्रारी आहेत. कठोर पाऊल उचलण्याची गरज महिला व तरुणींची असुरक्षितता वाढली. एकीकडे उच्च, आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले. परंतु स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन तसाच आहे. त्याला सामाजिक मान्यता असल्यासारखे हे तरुण वागतात. एकतर्फी प्रेम करुन तरुणींना त्रास दिला जात आहे. हे रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलावीत. - डॉ. मेघा पानसरे (अध्यक्ष : अखिल भारतीय महिला फेडरेशन )