शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकर रंगले रंगात, सप्तरंगांची केली मुक्त उधळण

By संदीप आडनाईक | Updated: March 30, 2024 19:02 IST

कोल्हापूर : सप्तरंगांची मुक्त उधळण, ओळखू न येणारे चेहरे, सकाळपासून हातात रंग, रंगाने भरलेले फुगे आणि भरलेली पिचकारी घेऊन ...

कोल्हापूर : सप्तरंगांची मुक्त उधळण, ओळखू न येणारे चेहरे, सकाळपासून हातात रंग, रंगाने भरलेले फुगे आणि भरलेली पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवण्यात गुंतलेली बच्चेकंपनी, कुटुंबातील मुले, नातवंडांसोबत रंगून गेलेले आबालवृद्ध, मैत्रीच्या नात्याला रंगांनी अधिक गहिरे करणाऱ्या या उत्सवात युवक-युवतींसह सारे कोल्हापूर शनिवारी अवघे रंगात रंगले. शहरातील रस्त्यांनाही यानिमित्ताने रंग चढला होता.होळीनंतर येणाऱ्या या रंगपंचमीच्या दिवसाची लहान मुले आतुरतेने वाट पाहत होती. भेदभाव विसरायला लावणाऱ्या आणि मनामनातील कटुता रंगांनी पुसून टाकणाऱ्या या दिवसाला भल्या सकाळी बच्चेकंपनीच्याच किलबिलाटाने जाग आली. उठल्या-उठल्या हातात वेगवेगळे रंग, रंगाने भरलेले फुगे घेऊन लहान मुलांनी एकमेकांना रंगवायला सुरुवात केली. दारात ठेवलेल्या बादलीतून पिचकारी भरुन येईल त्याला चिंब भिजवताना त्यांचा होणारा जल्लोष आणि गमती-जमती मोठ्यांनाही आनंद देणाऱ्या होत्या. त्यांच्यासोबत रंग खेळताना आईवडिल, बहिण भावांसोबत मोठेही लहान झाले होते.शालेय आणि महाविद्यालयीन मुलामुलींनीही रंग खेळण्यास सकाळपासूनच सुरुवात केली. घरातली मोठी माणसं, नातेवाईक, मित्रपरिवार, गल्लीतल्या मित्र-मैत्रिणींना रंगवून झाल्यानंतर रंगलेल्या चेहऱ्यांनीच शहरात अन्यत्र राहत असलेल्या मित्र-मैत्रिणींना रंगवण्यासाठी युवक-युवती ग्रुपने दुचाकीवरून फिरत होते. वाटेत कोणी मित्र भेटले की त्यांना रंगवून पुढे जायचे. एरव्ही आपल्या लुकबद्दल अधिक जागरुक असलेले मुले-मुली वेगवेगळे रंग आणि पिवडीने नखशिखांत रंगून ओळखू न येणाऱ्या चेहऱ्यानिशी दुचाकीवरुन सुसाट जाताना दिसत होते. या रंगांच्या खेळात मुलांसोबत महिलांही मागे नव्हत्या.कुटुंबीयांच्या सरबराईत गुंतलेल्या महिलाही कामे आटोपून रंग खेळायला बाहेर पडल्या. आपल्या परिसरातील अपार्टमेंट, सोसायट्या, कॉलन्या, पेठांमधील मैत्रिणींना रंगवण्यासाठी झुंडीने जात होत्या. एखाद्या महिलेने आढेवेढे घेतलेच तर त्यांना बाहेर काढून क्षणार्धात रंगवून आपल्यातलेच एक बनवायचे.लाईव्ह डीजे, खास साऊंड सिस्टीमवर रंगपंचमीमहिलांमधील जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे नाते अधिक घट्ट झाले. खास महिलांनाही मुक्तपण रंग खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी रंकाळा, अंबाई टँक, गजानन महाराज नगर आदी भागांमध्ये लाईव्ह डीजे, खास साऊंड सिस्टीम आणि पाण्याचे शॉवर लावलेले होते. याशिवाय विविध तरुण मंडळे, तालीम मंडळांनीही रंगपंचमीचे आयोजन केले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर