मारुती संजय यळ्ळूरकर (वय २२) रा. कुद्रेमणी ता. जि. बेळगाव असे मयत युवकाचे नाव आहे. मारूती आपल्या चंदगडला दिलेल्या बहिणीला सोडून परत येत असताना नागणवाडी येथील वळणावर समोरून अचानक बोलेरो पिकअप आली. त्याला मारुतीच्या दुचाकीची जोराची टक्कर झाली. त्यामध्ये मारुती रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला त्यामुळे तो जागीच ठार झाला. रात्री उशिरा या अपघाताची नोंद चंदगड पोलीस स्थानकात झाली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मारुती हा गवंडी काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण आहे.
चौकट
बहिणीची शेवटची पाठवणी
रक्षाबंधन आलेल्या बहिणीला पाठवण्यासाठी बुधवारी मारुती चंदगडला गेला होता. तिला सोडून येताना नागणवाडीच्या वळणावर मारुतीवर काळाने घाला घातला. त्यामुळे बहीण-भावाची ही शेवटची भेट ठरली.