आयटी कंपनीत काम करताना सुरुवातीला योगेश यांना बूट प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळविताना अडचणींचा सामना करावा लागला. या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या युवक-युवतींना ‘बूट’बाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने त्यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लिनक्स, विंडोज, युनिक्स, आदी ऑपरेटिंग सिस्टम्समधील बूट प्रक्रियेबाबतचे ‘हॅन्ड्स ऑन बूटिंग’ चे लेखन केले. इंग्रजीतील आणि ५२२ पानांच्या या पुस्तकाचे प्रकाशन जर्मनीतील अप्रेस पब्लिकेशनने केले. या प्रकाशन संस्थेने योगेश यांच्यासह अन्य २५ बेस्ट सेलर पुस्तके सामाजिक कार्यासाठी निधी उभारण्याकरिता कमी किमतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केली. या सर्व पुस्तकांच्या विक्रीमधून संकलित झालेला ३ लाख डॉलरचा निधी या प्रकाशन संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या खान ॲकॅडमीला दिला. सामान्य कुटुंबातील योगेश यांची सामाजिक बांधिलकी आदर्शवत ठरणारी आहे. या मानवतावादी कामगिरीबद्दल भारती विद्यापीठाचे संचालक डॉ. एच. एम. कदम, प्राचार्य डॉ. विजय घोरपडे यांनी अभिनंदन केले.
प्रतिक्रिया
मी आयुष्यात पहिल्यांदाच लिहिलेले पुस्तक हे बेस्ट सेलर ठरले. त्याच्या विक्रीतून जागतिक पातळीवर शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेला मदतीचा हात मिळाला. त्याचे खूप समाधान वाटत आहे.
-योगेश बाबर
प्रतिक्रिया
व्यापक समाज जाणीव असणारे उद्याचे टेक्नोक्रॅटस घडविणे हे भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याची पोचपावती योगेश यांनी केलेल्या अभिमानास्पद कामगिरीतून मिळाली आहे.
-डॉ. विजय घोरपडे, प्राचार्य.
फोटो (२१०१२०२१-कोल-योगेश बाबर (बुक)