कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या वर्षी योगदिनी औचित्य साधून राज्यातील २७०० पेक्षा अधिक ठिकाणी योग शिबिरांचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात एक कोटीपेक्षा अधिक नागरिक सहभागी होतील, अशी माहिती भाजप कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी दिली.
मानवाधिकारांचे व माध्यम स्वातंत्र्याचे हनन करणाऱ्या काँग्रेसी अत्याचारांची कहाणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी २५ जून हा आणीबाणीविरोधी काळा दिवस पाळण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. योगाभ्यास हे शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याचे प्रभावी साधन सिद्ध झाले असून भारतीय संस्कृतीची ही महान परंपरा आता जगभरातील जवळपास २०० देशांनीही स्वीकारली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व मनाचे सामर्थ्य वाढविणे यांसाठी योगसाधना उपयुक्त मानली जाते. या उपक्रमाद्वारे भाजपच्या कोल्हापूर शहरातील सात मंडलांमध्ये कार्यकर्त्यांद्वारे किमान दोन योग शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.