शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

करवाढीला बगल देणारे वर्ष

By admin | Updated: February 8, 2015 00:50 IST

उद्या सभेत शिक्कामोर्तब : आगामी पंचवार्षिक निवडणुकीचा परिणाम

 कोल्हापूर : महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आॅक्टोबरमध्ये होऊ घातली असल्याने निवडणुकीच्या तोंडावर शहरवासीयांवर करवाढ लादायची नाही, असा निर्धार पालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांनी केल्यामुळे सन २०१५-१६ या नवीन आर्थिक वर्षात शहरवासीयांची करवाढीतून सुटका होणार आहे. औपचारिक निर्णयावर सोमवारी (दि. ९) महापालिका सभेत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे घरफाळा, पाणीपट्टी, परवाना विभागाचे कर हे गतवर्षीप्रमाणेच राहतील. फेब्रुवारी महिना उजाडला की, महानगरपालिका प्रशासनाचे विविध विभाग उत्पन्नवाढीकरिता करवाढीचे प्रस्ताव तयार करून आधी स्थायी समितीकडे आणि त्यानंतर महासभेकडे मंजुरीकरिता पाठवितात. पुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत घरफाळा, पाणीपुरवठा, परवाना, इस्टेट, रुग्णालय, अग्निशामक यासह विविध करांचे दर निश्चितीवर निर्णय घेऊन महासभेने प्रशासनाकडे प्रस्ताव द्यायचे असतात. आगामी निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही प्रकारची करवाढ न करण्याचा निर्णय दोन्ही सत्तारूढ पक्षांच्या नेत्यांनी घेतला. त्यामुळे कार्यालयीन प्रस्तावही तसेच देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या; परंतु परवाना दरात सरासरी दहा टक्क्यांपर्यंत वाढ सुचविली आहे. पाणीपुरवठा विभागाने अद्याप प्रस्ताव दिलेला नाही. अग्निशमन दलाचा रुग्णवाहिका व शववाहिका यासाठी काही प्रमाणात भाडे आकारण्याचा विचार होता. टेंडर नोंदणी, परवाना नोंदणी अशा जनरल करात साधारणपणे १० ते २० टक्के दरवाढ सुचविण्यात आली आहे; परंतु स्थायी समितीने मागच्या वर्षाप्रमाणेच करांचे दर ठेवावेत, अशी शिफारस करून प्रस्ताव महासभेकडे पाठविले आहेत. सोमवारी महासभा होत आहे. या सभेपुढे सदरचे प्रस्ताव निर्णयाकरिता ठेवले आहेत. पुढील वर्षी वाढणार घरफाळा महानगरपालिका सध्या भांडवली मूल्यांवर आधारित घरफाळा आकारते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण ८ मधील नियम ७ अनुसार ज्या मिळकतींवर घरफाळा आकारला जाणार आहे, त्यांचे मूल्यांकन प्रत्येक पाच वर्षांनी करण्यात येते. यापूर्वी शहरवासीयांच्या मिळकतींचे मूल्यांकन २०१० -११ च्या दरानुसार झाले असल्याने यंदा जरी घरफाळा वाढणार नसला तरी पुढील वर्षी कोणत्याही परिस्थितीत तो वाढणार आहे. महापौर तृप्ती माळवी यांचा राजीनामा सोमवारच्या सभेत सादर होणार असून, त्यानंतर नव्या महापौरांची निवड होण्यास किमान बारा ते पंधरा दिवसांचा अवधी जाणार आहे; त्यामुळे पुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून नगरसचिव विभागाने करासंबंधीचे सर्व प्रस्ताव सोमवारच्या सभेत घेतले आहेत. (प्रतिनिधी)