शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव चव्हाण महान होऊनही विनम्र

By admin | Updated: March 15, 2017 01:01 IST

विजय कुवळेकर : शिवाजी विद्यापीठात ‘ग्रंथांनी रचलेला महापुरुष : यशवंतराव चव्हाण’ ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर : सातत्यपूर्ण वाचनामुळेच यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिपादनात कधीही पुनरावृत्ती आढळत नाही. महान होऊनही विनम्र असण्याचे, संयत पद्धतीने व्यक्त होण्याचे मूळही त्यातच आढळते. वाचनानेच यशवंतरावांसारखा निष्कलंक चारित्र्याचा पारदर्शक आणि निखळ माणूस घडला, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी मंगळवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि आनंद ग्रंथसागर प्रकाशनातर्फे आयोजित डॉ. आनंद पाटील लिखित ‘ग्रंथांनी रचलेला महापुरुष : यशवंतराव चव्हाण’ या ग्रंथाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातील कार्यक्रमास त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील हे प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. ज्येष्ठ पत्रकार कुवळेकर म्हणाले, सभ्यता, सुसंस्कृतता आणि अभिजातता यांचा तिहेरी संगम यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळतो. त्याचे प्रतिबिंब ‘ग्रंथांनी रचलेला महापुरुष’च्या पानोपानी आढळते. ग्रंथांतून वाचलेले तत्त्वज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करणारा नेता म्हणजे यशवंतराव होते. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, अप्रतिम वक्तृत्व आणि अफाट वाचन असणाऱ्या यशवंतरावांची कामगिरी अतुलनीय आहे. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, नीतिमूल्यांबद्दल अत्यंत आग्रही असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी तितक्याच सचोटीने विविध क्षेत्रांत कार्य केले. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. पाटील म्हणाले, चिरंतन विचार देणारा हा ग्रंथ असून डॉ. आनंद पाटील यांनी एक वेगळा ग्रंथ लिहिला आहे. कार्यक्रमात लेखक डॉ. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)वैचारिक, तत्वज्ञानदृष्ट्या समृद्धज्येष्ठ पत्रकार कुवळेकर म्हणाले, स्वखर्चाने आठ हजारांहून अधिक ग्रंथ खरेदी करून त्यांचे वाचन करणारा आणि त्यातून प्राप्त ज्ञानाचा आपल्या राष्ट्रासाठी वापर करणारा यशवंतरावांसारखा दुर्मीळ नेता आपल्याला लाभला. यशवंतरावांनी त्यांच्या हयातीत अनेक मोठमोठी पदे भूषविली. त्यातून ते आर्थिकदृष्ट्या श्रीमंत झाले नाहीत. तथापि, वाचनामुळे ते वैचारिक आणि तत्त्वज्ञानदृष्ट्या मात्र अत्यंत समृद्ध झाले.