शिरोली :
धनगर समाजाच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये यशवंत सेना कायम पाठीशी राहील, असे आश्वासन डॉ. विजयकुमार गोरड यांनी दिले. ते नागाव येथील यशवंत सेना कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अरुण माळी, तर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश तांबवे हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोरड म्हणाले, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक आणि होळकर घराण्याने उपखंडात इतिहास घडवला आहे. देशभरातील २२ कोटी धनगर समाजाची ही प्रतिके आहेत.
धनगर समाजाचा इतिहास सर्वज्ञात असून त्याचा प्रसार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे.
यावेळी नागाव येथे यशवंत सेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हासंपर्क प्रमुख डॉ. संदीप हजारे, जिल्हाध्यक्ष संजय काळे, योगेश हराळे, चंद्रकांत वळकुंजे, निवास कोळेकर, तमा शिरोळे, शहाजी बनकर, डॉ. शिवराज पुजारी, पोलीस पाटील बाबासोा पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष नंदकुमार मिठारी, गणपती सिद्ध, सतीश गावडे, भीमराव वळकुंजे उपस्थित होते.
फोटो ओळी
नागाव येथील कार्यक्रमात धनगर समाजाच्या इतिहासाची प्रतिमा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश तांबवे, सरपंच अरुण माळी, डॉ.संदीप हजारे आदींच्या हस्ते देण्यात आली.
२० शिरोली विजय गोरड