कोल्हापूर : पेट्रोल-डिझेलसह खत दरवाढविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी पुकारलेल्या बंदी आदेशाचा भंग करून तसेच कोरोना नियमावलींचे उल्लंघन केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार यांच्यासह एकूण १८ जणांवर गुन्हा नोंद केला.
गुन्हा नोंद केलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील (रा. सोळांकूर), शहराध्यक्ष आर.के. पोवार (रा. महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर), भैया ऊर्फ प्रताप यशवंत माने (रा. कागल), सुनील देसाई, आदिल फरास, अनिल साळोखे, महेंद्र चव्हाण, युवराज वारके, किसनराव कल्याणकर, रियाज कागदी, प्रसाद उगवे, संजय पडवळ, रमेश पोवार, संजय कराडे, रामराजे बदाले, सुहास साळोखे, जयकुमार शिंदे, सुनील जाधव (सर्व रा. कोल्हापूर).
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात बंदी आदेश पुकारला आहे. त्यामुळे राजकीय कार्यक्रमावर बंदी घातली आहे. तरीही लॉकडाऊन कालावधीत आदेशाचे उल्लंघन करून नियमबाह्य लोक एकत्र जमवून निदर्शने केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ आंदोलकांवर पोलिसात गुन्हे नोंदविले आहेत.