शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

Kolhapur: कुस्तीचे भीष्माचार्य बाळ गायकवाड यांचे निधन

By भारत चव्हाण | Updated: February 6, 2024 13:29 IST

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेेत्रातील मार्गदर्शक बाळ राजाराम गायकवाड (वय ९२) यांचे मंगळवारी सकाळी येथील खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन ...

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेेत्रातील मार्गदर्शक बाळ राजाराम गायकवाड (वय ९२) यांचे मंगळवारी सकाळी येथील खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. देशभरात दबदबा निर्माण केलेल्या उत्तरेतील पहिलवानांचा कर्दनकाळ ठरलेल्या कुस्ती सम्राट युवराज पाटील यांचे बाळ गायकवाड हे गुरू होत. अनेक जिगरबाज पहिलवानांना घडविणाऱ्या बाळ गायकवाड यांना कुस्तीचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जात होते. पन्हाळा तालुक्यातील पुनाळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.बाळ गायकवाड यांना ऐन तारुण्यात कुस्तीची आवड निर्माण झाली. त्यांनी कुस्ती खेळली खरी परंतु फारशी मैदाने केली नाहीत. परंतु कुस्ती कलेवरील प्रेमापोटी त्यांनी या क्षेत्राला वाहून घेतले. कुस्तीचे डावपेच, मैदानाच्या तयारीसाठी करावी लागणारी मेहनत, पहिलवानांचा आहार, विश्रांती याचे बारकावे समजावून घेतले. स्वत: घेतलेल्या कुस्तीतील ज्ञानाचा उपयोग त्यांनी नव्या दमाच्या पहिलवानांना देण्यासाठी केला.

गेली सत्तर वर्षे त्यांनी कुस्ती क्षेत्रासाठी एक मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडली. कुस्ती क्षेत्रात योगदान देता यावे म्हणून त्यांनी घरदार सोडून सर्वस्वाचा त्याग करत तालमीत वास्तव्य केले. अविवाहित राहून संन्यासी जीवन जगले. एवढेच नाही तर खरी कॉर्नरजवळील स्वत:च्या मालकीच्या जागेत कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची इमारत उभी करून कुस्ती कलेचा प्रसार व प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू केले.माजी कृषी मंत्री स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे, स्वर्गीय बाळासाहेब देसाई, स्वर्गीय महिपतराव बोंद्रे यांच्या सहकार्याने बाळ गायकवाड यांनी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली. पुढे हेच तालीम संघाचे कार्यालय, तसेच मोतीबाग तालीम बाळ गायकवाड यांची कर्मभूमी बनली. अतिशय कडक शिस्तीच्या बाळ यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कुस्तीच्या वाढीसाठी खर्ची घातले. तालीम संघाच्या कार्यालयात राहून त्यांनी पहिलवान घडविण्याचे कार्य सुरू केले. दादू चौगुले, चंबा मुत्नाळ, युवराज पाटील, लक्ष्मण वडार, विनोद चौगुले, विष्णू जोशीलकर यांच्यासह असंख्य पहिलवानांना घडविण्यात बाळ गायकवाड यांनी योगदान दिले. तालीम संघाचे जनरल सेक्रेटरी, चिफ पेट्रन अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.

‘पुरस्कारासाठी नाही, कुस्तीसाठी झटतोय’कुस्ती क्षेत्रातील बाळ गायकवाड यांचे योगदान लक्षात घेऊन तत्कालीन खासदार स्वर्गीय उदयसिंगराव गायकवाड, खासदार स्वर्गीय बाळासाहेब माने यांनी महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस केली होती. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनीही तशी विनंती केली होती. ‘मी पुरस्कारासाठी नाही तर कुस्तीसाठी झटतोय’ असे सांगून बाळ गायकवाड यांनी ती नम्रपणे नाकारली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्ती