शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

कोल्हापुरात जागतिक पांढरी काठी, दृष्टिदिन, प्रेरणा दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:46 PM

मिरजकर तिकटी येथील अंधशाळेत कोल्हापूर व जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, सी. पी. आर. हॉस्पिटल यांच्यातर्फे ‘जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिन’, ‘जागतिक दृष्टिदिन’ तसेच ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देमिरजकर तिकटी येथील अंधशाळेत जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिन कोल्हापूर व जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, सी. पी. आर. हॉस्पिटल कार्यक्रमात सहभागी मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी अंधशाळामार्गे रॅलीडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अंधांचे दैवत लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन

कोल्हापूर, दि. १६ : मिरजकर तिकटी येथील अंधशाळेत कोल्हापूर व जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, सी. पी. आर. हॉस्पिटल यांच्यातर्फे ‘जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिन’, ‘जागतिक दृष्टिदिन’ तसेच ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला.

यानिमित्त जनजागृती फेरीचे उद्घाटन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रॅली मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी अंधशाळामार्गे पार पडली.

‘जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिन’, ‘जागतिक दृष्टिदिन’ जनजागृती फेरी

या रॅलीमध्ये डॉ. एल. एस. पाटील, प्रकाश बोंद्रे, डॉ. अभिजित ढवळे, डॉ. सुजाता वैराट, डॉ. अजेट राव, डॉ. सुहास बोंद्रे, प्रकाश पाटील, वैद्यकीय पथक (आरबीएसके) अंधशाळेचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्र्थी, विद्यार्थिनी व सायबर कॉलेजचे समाजकार्य विभागाचे विद्यार्र्थी उपस्थित होते.

अंधशाळा येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अंधांचे दैवत लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष प्रकाश बोंद्रे यांनी अंधशाळेतील कार्यपद्धती व ‘पांढरी काठी दिना’चे महत्त्व उपस्थितांना पटवून सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी दैनंदिन जीवनात दृष्टीचे किती महत्त्व आहे ते सांगितले.

डॉ. अभिजित ढवळे यांनी अंधत्वाची कारणे, उपाय व ‘जागतिक दृष्टिदिना’चे महत्त्व सांगितले. यावेळी ज्ञानप्रबोधन भवन संचलित अंधशाळाचे अध्यक्ष प्रकाश बोंद्रे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वैष्णवी अंधशाळेतील विद्यार्थिनीने ब्रेल लिपीचे वाचन केले

 

टॅग्स :Schoolशाळाhospitalहॉस्पिटल