शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या राष्ट्रीय लोक अदालतीत दोन जोडप्यांचे संसार पुन्हा जुळाले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 19:12 IST

कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थीमुळे दोन जोडप्यांचा संसार तुटता-तुटता वाचला. ‘न्याय सबके लिए’ या बीद्र वाक्यात प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूरने शनिवारी जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देराष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन मध्यस्थीमुळे दोन जोडप्यांचा संसार तुटता-तुटता वाचलाजिल्हा मध्यस्थी केंद्राचे समन्वयक उमेशचंद्र मोरे यांच्याकडे समुपदेशन

कोल्हापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थीमुळे दोन जोडप्यांचा संसार तुटता-तुटता वाचला. ‘न्याय सबके लिए’ या बीद्र वाक्यात प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूरने शनिवारी जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते.या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखल पूर्व खटल्यामध्ये दोन जोडप्यांनी संसारिक वादामुळे वाद मिटवण्याठी काही दिवसापुर्वी विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थी केंद्राकडे धाव घेतली होती. त्यावेळी दाखलपूर्व खटल्यात मध्यस्थी करिता अर्ज भरुन घेण्यात आला होता.

दोन्ही पक्षकारांना जिल्हा मध्यस्थी केंद्र, कोल्हापूरचे पॅनेल वकिल अ‍ॅड. सिद्धी नलवडे , रिटेनर अ‍ॅड. योगिता हरणे यांनी समुपदेशन केले. त्यामुळे त्यांचा वैवाहिक वाद मिटवल्यास वेळ, श्रम, पैसा वाचेल आणि बहूमुल्य नाते टिकेल याची जाणीव करुन दिली. त्यामध्ये घरातील त्रयस्थामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यांचे सुद्धा समुपदेशन जिल्हा मध्यस्थी केंद्राचे समन्वयक उमेशचंद्र मोरे यांच्याकडे करण्यात आले आणि त्यामध्ये यश आले.

या दोन जोडप्यांना एकत्र आणण्यामुळे लहान मुलांची फरपट कायमची थांबली . या दोन्ही जोडप्यांचा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

समुपदेशन जिल्हा मध्यस्थीचे काम अ‍ॅड. तस्कीन पटेल यांनी पाहिले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे रिटेनर लॉयर अ‍ॅड. योगिता हरणे, अ‍ॅड. सारिका तोडकर, अ‍ॅड. शुभांगी निंबाळकर, विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक एस.एस. बाबर, जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक संभाजी पाटील, सर्जेराव सावंत , ज्ञानेश्वर मिरजकर , गुरुदास येळवडेकर, शैलेश पवार, बाळासाहेब खुपेरकर, अनिकेत मोहिते आणि सारिका शिंदे यांनी काम पाहिले. यासाठी सर्व कर्मचारी, वकील , पक्षकार यांचे सहकार्य लाभले. 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर