शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

कोल्हापूर स्कूलसाठी जगातील कॅनव्हास खुला - किशोर पुरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 21:50 IST

राजर्षी शाहू महाराजांच्या समाधिस्थळाचे काम करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. - किशोर पुरेकर

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद

इंदुमती गणेश ।अमेरिकेतील पोर्ट्रेट सोसायटीच्या वतीने शिल्पकार किशोर पुरेकर यांना ‘सिग्नेचर स्टेटस’ हा सन्मान मिळाला आहे. हा सन्मान मिळालेले ते भारतातील पहिले शिल्पकार आहेत. हा गौरव केवळ एका कलाकाराचा नाही, तर कोल्हापूर स्कूल नावाच्या परंपरेचा, येथील दर्जेदार कलाकृतींचा आहे. अशा सन्मानामुळे जगभरातील कॅनव्हास कलाकारांसाठी खुला होतो. या निमित्ताने पुरेकर यांची घेतलेली ही चर्चेतील मुलाखत...

प्रश्न : या सन्मानाचे विशेष महत्त्व काय?उत्तर : संस्थेच्या वतीने दरवर्षी या सन्मानासाठी प्रवेशिका मागविल्या जातात. त्यासाठी आपण बनविलेल्या कलात्मक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारांतील १० कलाकृती मी पाठविल्या होत्या. या कलाकृतींचा दर्जा बघून सन्मानासाठी निवड केली जाते. त्यामुळे कलाकृतींसोबतच आपल्यातील कलाकाराचा एक दर्जा मिळतो. हा सन्मान जाहीर झाल्यानिमित्त जागतिक पातळीवरच्या एका मॅगझिनमध्ये माझी मुलाखत छापण्यात आली आहे. जागतिक पातळीवरील विविध प्रदर्शनांमध्ये प्राधान्य मिळते. जगभरातील रसिकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. तुमच्या कलाकृतींचा कॅनव्हास अधिक रुंदावतो.

प्रश्न : ‘कोल्हापूर स्कूल’बद्दल काय सांगाल?उत्तर : राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या राजाश्रयामुळे कोल्हापूरला चित्र-शिल्प कलाकारांची फार मोठी परंपरा लाभली आहे. वास्तववादी शैलीतील कलाकृती हे कोल्हापूरचे वैशिष्ट्य आहे. एका गल्लीत किमान चार घरे चित्रकार, शिल्पकारांची असतात. इथे कलाकारांची खाण आहे. व्यावसायिकदृष्ट्या करिअर हा कलेचा वेगळा भाग झाला; पण स्वत:मधील कलाकाराच्या आनंदासाठी कलाकृती घडविल्या जातात. जागतिक पातळीवरील संस्थांना अपेक्षित असलेला कलात्मक दर्जा कोल्हापूरने टिकून आहे.प्रश्न : कलेच्या क्षेत्रात समाजमाध्यमाची भूमिका कशी आहे?उत्तर : इंटरनेटच्या माध्यमातून आता जग इतके जवळ आले आहे की, केवळ एका मेलवर तुम्ही कलाकृती पाठवू शकता. याच माझ्या १० कलाकृती प्रत्यक्षात अमेरिकेत नेणे, आणणे प्रवास हा सगळा खर्च झेपण्यासारखा नसतो; त्यामुळे समाजमाध्यमं ही जगभरात पोहोचण्याचे एक माध्यम आहे. त्याचा वापर तुम्ही कोणत्या उद्देशाने आणि कशा रीतीने करता, यावर सगळं अवलंबून आहे. 

  • अत्याधुनिक साधने

चित्रकार-शिल्पकारितेच्या क्षेत्रातही आता अनेक अत्याधुनिक साधने आली आहेत. त्यांच्या साहाय्याने कलाकृती घडतात; पण त्यांना आर्टिस्टिक टच राहत नाही. जेव्हा एखादा कलाकार मनापासून कलाकृती साकारत असतो तेव्हा त्याने आपले सगळे कौशल्य, ज्ञान, अनुभव पणाला लावलेले असते आणि ते कलाकृतीतून झळकते. आर्टिफिशिअल कलाकृतीत हे दिसणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर