शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

पक्ष कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची लगबग

By admin | Updated: January 14, 2017 00:36 IST

जिल्हा परिषद रणांगण : फारसे न येणाऱ्यांचीही गर्दी; पहिल्या टप्प्यात उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूरजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता पक्षांच्या कार्यालयांतील कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. याबरोबरच कार्यकर्ते नेत्यांच्या घरी आणि त्यांच्या वैयक्तिक कार्यालयांवरही धडकत असून, पहिल्या टप्प्यात उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करण्याचे काम सुरू आहे. एरवी आंदोलनांच्या बैठकांना न दिसणारे चेहरेही आता उमेदवारीसाठी पक्षांच्या कार्यालयांमध्ये दिसत आहेत.स्टेशन रोडवर राष्ट्रीय कॉँग्रेसचे कार्यालय गेली अनेक वर्षे आहे. या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या शेडवर अजूनही पत्रे घातले गेले नाहीत, हे वास्तव आहे. तरीही या ठिकाणी कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी आणि बाबूराव कांबळे बसून असतात. या निवडणुकीमुळे येथे कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे. उमेदवारीसाठीचे अर्ज देण्या-घेण्याचे काम सुरू आहे. अर्जासोबत पक्षाने ठरविलेला निधीही संकलित केला जात आहे. मेळावा, बैठका यानिमित्ताने येथे मोठी गर्दी होत असते. आता तर उमेदवारीसाठीची धावपळ असल्याने अर्ज देवाणघेवाणीसाठीच कार्यकर्ते येथे येतात. मुलाखतीही येथेच घेतल्या जातील. मात्र, सूत्रे हलणार ती ‘गॅरेज’ आणि ‘अजिंक्यतारा’वरून एवढे मात्र निश्चित!ताराबाई पार्कमध्ये वास्तव्यास असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे यांच्या बेसमेंटमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा कार्यालय आहे. राष्ट्रवादी सत्तेत असताना येथून कार्यालय हलवून टाटा मॉलच्या पलीकडे नेण्याचे प्रयत्न झाले. इमारतीचे आरेखन तयार करण्याबाबत सांगलीच्या एका आर्किटेक्टला काम देण्यात आले. मात्र, हे नियोजन कागदावरच राहिले. त्यामुळे खाडे यांच्या बेसमेंटमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे थांबून असतात. त्यांचीही अर्ज देवाणघेवाण सुरू आहे. त्यांचे बंधूही अनेकवेळा त्यांच्या मदतीला असतात. इथेही कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कधी नव्हे ते पहिल्यांदा बिंदू चौकातील सबजेलजवळच्या सुशीला सदनमध्ये धावपळ दिसू लागली आहे. याआधी जिल्ह्यात भाजपचे मोजके नेते आणि कार्यकर्ते असल्याने या कार्यालयाकडे फारशी गर्दी नसायची. मात्र, आता याच कार्यालयात वर्दळ वाढली आहे. शुक्रवारी दुपारी येथे गेल्यानंतर भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई हे तालुकावार इच्छुकांच्या यादीवर शेवटचा हात फिरवित होते. जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा त्यांच्या मदतीला होते. सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या कार्यालयाचे रूपडे बदलले आहे. तरीही आता पार्किंगसाठी अडचणीचे ठरत असलेले हे छोटे कार्यालय बदलण्याची कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा कार्यालय सुरू केले आहे. मात्र, येथून अर्ज देवाणघेवाण सुरू न करता जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनीच तालुका पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्राथमिक आराखडा तयार केला आहे. शिवसेनेचे जिल्हा कार्यालयच नाहीशिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार आणि मुरलीधर जाधव या तिघांकडे जिल्ह्यातील बारा तालुके विभागून देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे मध्यवर्ती जिल्हा कार्यालय नाही. शिवसेनेच्या आमदारांची निवासस्थाने हीच त्यांची कार्यालये आहेत. देवणे यांचे कार्यालय देवल क्लबसमोर, तर पवार यांचे पद्मा टॉकीजजवळ आहे. तेथे हे नेते आल्यानंतर शिवसैनिकांची लगबग वाढते; अन्यथा जिल्ह्याच्या दौऱ्यातच सैनिक त्यांना भेटतात. वैयक्तिक भेटीसाठीही कार्यकर्ते घराकडेयाबरोबरच आमदार सतेज पाटील यांना भेटण्यासाठी त्यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावर, माजी आमदार महादेवराव महाडिक यांना भेटण्यासाठी गोकुळ, ताराबाई पार्क किंवा राजाराम कारखान्यावर त्यांच्या वेळेप्रमाणे, पी. एन. पाटील यांना भेटण्यासाठी गॅरेजवर किंवा सकाळी त्यांच्या निवासस्थानी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.