शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

इचलकरंजीत यंत्रमाग कामगारांची निदर्शने

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

सुधारित वेतन प्रश्न : कृती समितीचा सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या सुधारित वेतनाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी यंत्रमाग कामगार संघटनांच्या कृती समितीने शुक्रवारी येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. मोर्चाची पूर्वसूचना देऊनही सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत म्हणून काही वेळ रास्ता रोकोही करण्यात आला.यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी सन १९८५ पासून शासनाने किमान वेतनाची फेररचना केलेली नाही. म्हणून येथील लाल बावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीवेळी सरकारने २९ जानेवारी २०१५ रोजी सुधारित किमान वेतन जाहीर केल्याचे सांगितले. त्या सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी कामगार संघटना वारंवार आंदोलने करीत आहेत. मात्र, सरकारच्यावतीने त्याची दखल घेतली जात नाही. म्हणून शुक्रवारी येथील यंत्रमाग कामगार संघटनांच्या कृती समितीने मोर्चा काढला आणि सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.मोर्चाची पूर्वसूचना देऊनसुद्धा सहायक कामगार आयुक्त गुरव हे कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत सहायक कामगार आयुक्त गुरव कार्यालयात येत असल्याचा निरोप दिल्याने आंदोलन संपविण्यात आले. कृती समितीच्यावतीने गुरव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चासमोर कामगार नेते दत्ता माने, शामराव कुलकर्णी, भरमा कांबळे, परशराम आगम, आदींची भाषणे झाली. येथून पुढील काळात लढा तीव्र करण्याचे घोषित करून मोर्चा संपविण्यात आला. (प्रतिनिधी)