शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

कामगारांचा विराट मोर्चा

By admin | Updated: October 14, 2016 01:17 IST

तीन तास ठिय्या : दिवाळीपूर्वी बोनस न दिल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर ‘शिमगा’

कोल्हापूर : सर्व बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस न दिल्यास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरासमोर ‘शिमगा आंदोलन’ करण्याचा इशारा गुरुवारी भारतीय कामगार संघटना केंद्र (सिटू)तर्फे देण्यात आला. बांधकामासह ऊस तोडणी, घरेलू मोलकरीण कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शाहूपुरी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढून भरउन्हात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.दुपारी एकच्या सुमारास शिवाजी पेठेतील गांधी मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हात मोठ्या संख्येने बांधकाम, ऊस तोडणी, वाहतूक, कंत्राटी, घरेलू मोलकरीण कामगार सहभागी झाले होते. लाल झेंडे व मागण्यांचे फलक घेतलेल्या कामगारांकडून घोषणाबाजी करण्यात येत होती. गांधी मैदान, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, लक्ष्मीपुरी, स्टेशन रोडमार्गे शाहूपुरी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय या ठिकाणी मोर्चा येऊन या ठिकाणी आंदोलकांनी रणरणत्या उन्हात ठिय्या मारला. घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. यावेळी आंदोलकांसमोर ‘सिटू’ जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष जाधव म्हणाले, ऊस तोडणी कामगारांसाठी जानेवारी महिन्यात मंडळ स्थापन करण्याची घोषणा अस्तित्वात आलेली नाही. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार, ऊसतोडणी कामगार संघटना व सहाय्यक कामगार आयुक्त यांची संयुक्त बैठक घ्यावी.जिल्हा सचिव भरमा कांबळे यांनी बांधकाम कामगारांना दिवाळीपर्यंत बोनस मिळाला नाही तर पालकमंत्री पाटील यांच्या घरासमोर ‘शिमगा’ आंदोलन करण्याचा इशारा दिला. २०१४ मध्ये कामगारांना ३००० रुपये बोनस देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यामध्ये अद्याप २००० जणांना लाभ मिळालेला नाही. गतवर्षी बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये देण्याची घोषणा झाली; परंतु २२ हजारांपैकी एकालाही त्याचा लाभ मिळालेला नाही. यासह यावर्षी कामगारांना १० हजार रुपये बोनस दिवाळीपूर्वी दिला नाही तर कोणत्याही परिस्थितीत आंदोलन होणारच, असेही त्यांनी सांगितले. कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव म्हणाले, कामगार खात्यासाठी असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी या कार्यालयाकडून केली जात नाही. त्यामुळे कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.त्यानंतर मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना सादर करण्यात आले. ज्या बांधकाम कामगारांच्या ३ हजार लाभाची पडताळणी झालेली आहे. त्यांच्या सेवापुस्तिकेवर नोंद असूनही ती दिलेली नाही ती त्वरित द्यावी. ऊस तोडणी व वाहतूक कामगार, ऊस वाहतूकदारांची माथाडी मंडळात तातडीने नोंदणी सुरू करून त्यांना सेवापुस्तिका व ओळखपत्र देण्यात यावे. त्यांना प्रॉव्हिडंड फंड, बोनस, अपघात विमा, रजा आणि वैद्यकीय सेवा आदी लाभ सुरू करावेत. घरेलू कामगारांसाठी असलेल्या कल्याणकारी मंडळास निधी उपलब्ध करून द्यावा. त्यांना रेशनवर दरमहा ३५ किलो धान्य उपलब्ध करावे. कंत्राटी कामगारांना कामगार कायद्यांतर्गत सर्व सुविधा द्याव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात प्रा. आबासाहेब चौगले, दत्ता माने, प्रकाश कुंभार, शिवाजी मगदूम यांच्यासह कामगार सहभागी झाले होते.मोर्चाचे चौथे वर्षकामगारांच्या मागण्या अद्याप पूर्ण क्षमतेने पूर्ण न झाल्याने कामगार आयुक्त कार्यालयावरील मोर्चा दरवर्षी ताकदीने होत आहे. दिवाळीच्या तोंडावर निघणाऱ्या या मोर्चाचे हे चौथे वर्ष असून यावेळची संख्याही लक्षणीय होती. विशेष म्हणजे या मोर्चात बांधकाम कामगार आपल्या कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती दखलपात्र होती. वाहतुकीची कोंडीया आंदोलनात कामगार प्रचंड संख्येने सहभागी झाले. विविध तालुक्यांतून कामगार ट्रक, टेम्पो, जीप, दुचाकी अशा मिळेल त्या वाहनांतून संघटनेचे झेंडे लावूनच सकाळपासूनच दाखल झाले. वाहने मोकळ्या जागेत लावण्यात आली होती. मोर्चामुळे शहरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली, तर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने शाहूपुरीतील वाहतूक कोलमडली होती.