शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

कार्यकर्त्यांना ‘जागते रहो’चा सल्ला

By admin | Updated: October 31, 2015 00:22 IST

छुप्या प्रचारावर जोर : प्रतिष्ठेच्या लढाईतील आजचा दिवस महत्त्वाचा

एकनाथ पाटील -कोल्हापूर -महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी थंडावली... आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी हवेत विलीन झाल्या... आता फक्त राहिला तो छुपा प्रचार... प्रतिष्ठेच्या लढाईतला महत्त्वाचा अंतिम दिवस... शनिवार. त्यानंतर उद्या, रविवार (दि. १) मतदान... या पार्श्वभूमीचा अंदाज घेत अनेक घडामोडींची उलथापालथ होणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला उधाण येणार... गड जिंकायचाच म्हणून सर्वच उमेदवारांनी ‘गनिमी कावा’ पद्धत अवलंबली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रभागात कार्यकर्त्यांना तळ ठोकून बसण्याचे फर्मान काढले आहे. एका रात्रीत काहीही घडू शकते, याचा अंदाज घेत त्यांनी कार्यकर्त्यांना हाक दिली आहे, ‘जागते रहो... रात्र वैऱ्याची आहे.’महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने संपूर्ण शहर ढवळून निघाले. गल्ली-बोळांत लहानापासून वयोवृद्धांपर्यंत फक्त निवडणुकीचीच चर्चा ऐकायला मिळते. यंदाच्या निवडणुकीत तर महिला वर्ग आघाडीवर आहे. प्रचारफेऱ्या, कोपरा सभा, नेत्यांचे मेळावे, सभा, रॅलीने या निवडणुकीत वेगळाच रंग चढला आहे. प्रत्येक उमेदवार ईर्ष्येला पेटला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध भेटवस्तूंचे वाटप केले. जेवणावळींसह काही ठिकाणी पर्यटन सहलींही काढल्या होत्या. प्रचारासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी पायांना भिंगरी बांधली आहे. शहरात बावीस दिवसांच्या प्रचाराच्या रणधुमाळीचा शुक्रवारी शेवट झाला. राहिला फक्त एक दिवस. या दिवसातच महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता असल्याने उमेदवारांसह कार्यकर्ते डोळ्यांत तेल घालून रात्रीचा जागर घालत आहेत. कार्यकर्त्यांनी गल्लीबोळापासून ते चौकापर्यंत व दरवाजापासून ते स्वयंपाकघरापर्यंत वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी मोहीम राबविली आहे. कोण कुठे जातो, कोण कोणाला भेटतो, अनोळखी व्यक्ती भागात शिरतेय का? याकडे कार्यकर्ते करडी नजर ठेवून लपून-छपून कानोसा घेत आहेत. उमेदवार फोनाफोनी करून कार्यकर्त्यांकडून वातावरणाची माहिती घेत आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला कुठेही वळवाप्रमाणे पैशांचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे भरती-ओहोटी येण्याची दाट शक्यता असल्याने उमेदवार सतर्क आहेत. प्रत्येकाने आपापल्या भागात फिल्डिंग लावली आहे. ‘गनिमी कावा’ कोठे वापरायचा यासाठी गुप्त बैठका घेतल्या जात आहेत. ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने विजयासाठी वाट्टेल ते करण्याचा, अगदी साम-दाम-दंड-भेद, आदींचा वापरही करण्याची उमेदवारांनी तयारी केली आहे. पैजा रंगल्या : समर्थकांकडून देव पाण्यात या निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर उतरले आहेत. भाजपने मात्र स्थानिक ‘ताराराणी’शी आघाडी केली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये चुरस आहे. साहेब व वहिनींच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत; तर काहींनी कुलस्वामीला अभिषेक घातले आहेत. महिलांनी उपवास व नवस बोलून दाखविले आहेत. प्रचाराचा धुमधडाकामहानगरपालिका निवडणुकीत ८१ प्रभागांत प्रमुख पक्षांसह ५०६ उमेदवार रिंंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत शहरासह उपनगरात दीड हजार मेळावे-सभा, १२०० प्रचारफेऱ्या, १ हजार कोपरा सभांनी शहर दणाणून निघाले.