शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात पेटवून घेतलेल्या कार्यकर्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:10 IST

ichlkarnaji, crimenews, fire, suicide, kolhapurnews इचलकरंजी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने घंटागाडीचालकाकडून झालेल्या अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ व मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी नगरपालिकेच्या दक्षिण बाजूच्या प्रवेशद्वारात पेटवून घेतले. ते भाजून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण या सामाजिक कार्यकर्त्याचा काही तासातच उपचारादरम्यान मृत्यू झाला. नरेश भोरे असे त्यांचे नाव आहे.

ठळक मुद्देनगरपालिकेच्या प्रवेशद्वारात पेटवून घेतलेकार्यकर्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू

इचलकरंजी : येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने घंटागाडीचालकाकडून झालेल्या अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ व मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी नगरपालिकेच्या दक्षिण बाजूच्या प्रवेशद्वारात पेटवून घेतले. ते भाजून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण या सामाजिक कार्यकर्त्याचा काही तासातच उपचारादरम्यान मृत्यू झाला. नरेश भोरे असे त्यांचे नाव आहे.

या घटनेमुळे पोलिस, नगरपालिका प्रशासन, कर्मचारी, तसेच नागरिकांत एकच धावपळ उडाली. पोलिस व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पोते टाकून तसेच अग्निरोधक बंबातील पावडरचा मारा करून आग विझवली. तोपर्यंत ते भाजून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण या सामाजिक कार्यकर्त्याचा काही तासातच उपचारादरम्यान मृत्यू झाला.याबाबत अधिक माहिती अशी, आठ दिवसांपूर्वी शहापूर परिसरातून एका घंटागाडीचालकाने मेलेले डुकर घंटागाडीला बांधून रस्त्यावरून ओढत नेत होता. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते भोरे यांनी त्याला या वस्तीतून तू असे मृत डुकर ओढत नेवू नकोस, म्हणून अटकाव केला. त्यावर चिडून संबंधित चालकाने भोरे यांना शिवीगाळ व मारहाण केली.

या प्रकाराच्या निषेधार्थ भोरे यांनी नगरपालिकेला संबंधित ठेकेदार कंपनीवर पेटा अ‍ॅनिमल कायद्यांतर्गत कारवाई करावी व संबंधित घंटागाडीचालकावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चार दिवसांपूर्वी केली होती. त्यामध्ये कारवाई न झाल्यास २६ आॅक्टोबरला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार सोमवारी भोरे यांनी नगरपालिकेच्या दक्षिण बाजूच्या पार्किंग मार्गातून आत प्रवेश करून स्वत:ला पेटवून घेतले. त्यामुळे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसह नगरपालिका कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. धावपळ करत पोलिसांनी पोते टाकून आग विझविण्यासह त्यांच्या अंगावरील जळालेले कपडे फाडले. तोपर्यंत अग्निरोधक बंबाचा वापर करून एका कर्मचाºयाने पावडरचा फवारा केला व आग विझवून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, पण या सामाजिक कार्यकर्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूरSuicideआत्महत्या