देवस्थान समितीचे कामकाज होणार पेपरलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:27 AM2021-09-23T04:27:23+5:302021-09-23T04:27:23+5:30

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे कामकाज आता पेपरलेस होणार आहे. याबाबतची टेंडर प्रक्रिया झाली असून, कर्मचाऱ्यांना हे ...

The work of the temple committee will be paperless | देवस्थान समितीचे कामकाज होणार पेपरलेस

देवस्थान समितीचे कामकाज होणार पेपरलेस

Next

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे कामकाज आता पेपरलेस होणार आहे. याबाबतची टेंडर प्रक्रिया झाली असून, कर्मचाऱ्यांना हे काम कसे करायचे याचे प्रशिक्षण बुधवारी देण्यात आले. यामुळे देवस्थानशी निगडित सर्व मंदिरे, खातेदार, उपसमित्या, त्यांची मुदत, खंड, कर्मचाऱ्यांचे पगार, टेंडर प्रक्रिया अशी सगळी माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

देवस्थान समितीचे कामकाज प्रशासकांकडे आल्यापासून विकासकामांवर तसेच समितीचे कामकाज अधिक वेगाने, पारदर्शकपणे व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार व धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा अनुभव गाठीशी असलेले सचिव शिवराज नायकवडी यांनी यात विशेष लक्ष घातले आहे. समिती स्थापन झाल्यापासून सगळे काम कागदोपत्री केले जाते. अगदी लेखापरीक्षणाचा अहवालदेखील ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यात आला आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट असल्याने पेपरलेस कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला. सार या कंपनीला त्याची निविदा मंजूर करण्यात आली आहे.

देवस्थान अंतर्गत असलेली मंदिरे, जमिनी, उपसमित्या, खंड, उत्पन्न, खातेदार, कर्मचाऱ्यांचे पगार, तसेच दैनंदिन कामकाज ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. त्यात न्याय व विधी खात्याने केलेल्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या सॉफ्टवेअरची माहिती व त्याचे प्रशिक्षण बुधवारी समितीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यात सचिवांनी काही सुधारणा व बदल सुचवले आहेत, त्यांचा अंतर्भाव करून हे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे एका क्लिकवर सगळी माहिती मिळणार आहे. व्यवहार व कामकाजात पारदर्शकता येणार आहे. महिनाअखेरपर्यंत हे पेपरलेस काम सुरू होण्याची शक्यता आहे.

---

Web Title: The work of the temple committee will be paperless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.