लोकमत न्यूज नेटवर्क
सेनापती कापशी : तमनाकवाडा (ता. कागल) ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कार्य करून राष्ट्रीय पुरस्कार मिळविला. याचा आदर्श राज्यातील ग्रामपंचायतींनी घ्यावा, असेच चांगले लोकाभिमुख काम करून पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
तमनाकवाडा ग्रामपंचायतीस केंद्र व राज्य शासनामार्फत दिला जाणारा दीनदयाळ उपाध्याय पंचायत राज्य सशक्तीकरण २०१९-२० राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तमनाकवाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका वासंती अशोक मगर / मुसळे, सरपंच अलका दयानंद साळवी, उपसरपंच आक्काताई बाळू तिप्पे याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य, दत्तात्रय चौगले, विनोद कांबळे, महादेव पाटील, रंजना चौगले, अस्मिता लोहार, दगडू चौगले, आनंदा कोकीतकर, डी. आर. चौगले, दयानंद साळवी, बळवंत तिपे, शिवाजी तिपे, भिकाजी तिप्पे, दादासो तिप्पे, राहुल तिप्पे, वसंत डावरे, अण्णाप्पा तिप्पे, सुभाष पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो - तमनाकवाडा (ता. कागल) ग्रामपंचायतीस राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ग्रामसेविका वासंती मगर, सरपंच अलका साळवी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.