शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

सहापदरीकरणाच्या सुधारित आराखड्याचे काम सुरू, पूरनियंत्रणसंबंधी नियमावलींचा विचार करा

By संदीप आडनाईक | Updated: December 17, 2023 18:30 IST

असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सची नव्याने मागणी

कोल्हापूर: पंचगंगा नदीवरील कागल-सातारा पॅकेज-१ अंतर्गत शिरोलीतील नवीन पुलाच्या दोन्ही बाजूंना भराव टाकून काम करण्याला असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सने विरोध केल्यामुळे नव्याने सुरू असलेला सुधारित आराखडा केंद्र, तसेच राज्य सरकारची पूरनियंत्रणासंदर्भातील नियमावलींनुसार आणि वडनेरे समितीच्या अहवालातील शिफारशींनुसारच करावा, अशी नवी मागणी असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सने शनिवारी ई-मेलद्वारे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. या सूचना न पाळल्यास कोल्हापूर आणि परिसराला महापुराचा धोका कायमस्वरूपी राहील, असा इशाराही दिला आहे.

शिरोली येथील नवीन पूल सध्याच्या पुलापेक्षा १० ते ११ फूट उंच अणि बास्केट ब्रिज त्यापेक्षाही जास्त म्हणजे अंदाजे १८ फूट उंचावर बांधण्यासाठी त्या प्रमाणात दोन्ही बाजूंना भरावाचे नियोजन आहे. याला असोसिएशनने विरोध केला आहे. जागतिक तापमानवाढ व हवामानातील बदल यामुळे बदललेल्या पर्जन्यवृष्टीचे स्वरूप पाहता केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, या नियमावलीला डावलून कोल्हापुरातील काम करण्यात येत असल्याची भीतीही असोसिएशनने या पत्रात व्यक्त केली आहे.

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाचे पूरनियंत्रणसंबंधी २०१८ मधील परिपत्रक, तसेच २०१५ मधील जल संसाधने विभागाचे परिपत्रक, इंडियन रोड काँग्रेस कोडमधील मार्गदर्शक तत्त्वे, निषिद्ध क्षेत्र (ब्लू लाइन) आणि नियंत्रण क्षेत्रातील (रेड लाइन) मार्गदर्शक तत्त्वे, तसेच वडनेरे समितीच्या अहवालातील शिफारशींनुसार असंख्य नियमावली आहे. त्याला डावलले जात आहे, असा आरोप असोसिएशनने केला आहे.यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, विरोधी पक्षनेते, पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी, तसेच प्राधिकरणासंबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे; परंतु ठोस कार्यवाही झालेली नाही. याशिवाय महापुरात महामार्गावरील नदीवरील पूल बांधताना वाहतूक सुरू राहावी, आपत्ती निवारणासाठीच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, अशाही सूचना असोसिएशनने केल्या आहेत.

भविष्यात निश्चित कालावधी ठरवून जिल्ह्यातील पूरप्रवण क्षेत्रातील पुलांबाबतीत ठोस धोरण ठरवून महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी आराखडा बनवावा, तांत्रिक संस्था म्हणून असोसिएशनचा सहभाग यापुढेही राहील.-अजय कोराणे, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर