शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

नगररचना विभागाचे कामकाज कोल्हापूर एजंटांमार्फत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:39 IST

कोल्हापूर : ‘एक खिडकी योजना’ असूनही ‘ना हरकत दाखले’ आणण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांतून नागरिकांची होणारी पायपीट टाळण्यासाठी ही योजनाच बंद करून पूर्वीप्रमाणेच विभागीय कार्यालये सक्षम करावीत,

ठळक मुद्देमहापालिका सभेत आरोप :दप्तर दिरंगाईमुळे ‘एक खिडकी योजना’ बंद करण्याची मागणी

कोल्हापूर : ‘एक खिडकी योजना’ असूनही ‘ना हरकत दाखले’ आणण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांतून नागरिकांची होणारी पायपीट टाळण्यासाठी ही योजनाच बंद करून पूर्वीप्रमाणेच विभागीय कार्यालये सक्षम करावीत, अशी आग्रही मागणी शुक्रवारी झालेल्या महानगरपालिका सर्वसाधारण सभेत करण्यात आली. नगररचना कार्र्यालयातील कामकाज अधिकाºयांच्या हातात राहिले नसून एजंटांमार्फत चालत असल्याचा गंभीर आरोपही सभेत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या.

शहराची विकास योजना सुधारित करण्याकरिता पायाभूत नकाशा व विद्यमान भूवापर नकाशा खासगी संस्थेमार्फत तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण करून तयार करण्यास निविदा मागविण्याच्या प्रस्तावास सभेत मंजुरी देण्यात आली. त्यावेळी चर्चेत नगररचना विभागाच्या कारभारावर सदस्यांनी थेट हल्लाबोल केला. राजसिंह शेळके यांनी नगररचना विभागाचा पंचनामा केला. या विभागाकडे सर्वप्रकारचे बांधकाम परवाने देण्याचे काम सोपविण्यात आले आहे; परंतु येथे प्रचंड दप्तर दिरंगाई असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.

‘एक खिडकी योजना’ असूनही वेगवेगळ्या कार्यालयात जाऊन ‘ना हरकत दाखले’ मिळविण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते तसेच दाखल्यांसाठी एक हजार रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत घेतले जातात. एकीकडे या विभागातील अधिकारी मोठ्या बांधकाम योजनांच्या परवानगी बिल्डरांच्या घरात जाऊन देतात. रेरा कायदा लागू होण्याच्या आधी तर रात्रभर जागून परवाने दिले गेले; परंतु छोट्या घरांच्या बांधकामांना मात्र लवकर परवानगी दिली जात नाही. नागरिकांची पिळवणूक होते. या विभागाचा कारभार एजंट चालवत आहेत, याकडे राजसिंह शेळके यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले.

चारही विभागीय कार्यालये रिकामी करून एक खिडकी योजना सुरू केली खरी, पण तेथे जर पिळवणूकच होणार असेल तर पूर्ववत विभागीय कार्यालये सक्षम करा, त्यांना अधिकार द्या, अशी मागणी सुनील कदम यांनी केली. विजय खाडे-पाटील यांनी या नगररचना विभागातील अनेक फाईल चोरीला जात असल्याची गंभीर तक्रार केली.आयुक्त कार्यालयातील फाईल चोरीलाबोगस टीडीआर प्रकरणातील एक फाईल चक्क आयुक्त कार्यालयातून चोरीस गेली असल्याचे भूपाल शेटे यांनी सभागृहाला सांगितले. नगररचना कार्यालयातील संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केल्यानंतर मागच्या आयुक्तांनी दिलेला टीडीआर स्थगित केला; पण खोटी कागदपत्रे लपविण्याकरिता फाईलच गायब करण्यात आली, असे शेटे म्हणाले. त्यावर नगररचना सहायक संचालक धनंजय खोत यांनी ही फाईल सापडत नसल्यामुळे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याची कबुली दिली.अधिकाºयावर कारवाई करासुधारित विकास योजना करण्यासाठी राज्य सरकारने दोनवेळा बजावूनसुद्धा नगररचना सहायक संचालक धनंजय खोत यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांनी जबाबदारी टाळली. त्यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान झाले आहे. रेरा कायदा येणार म्हणून बांधकाम परवाना देण्यात धन्यता मानणाºया खोतांनी विकास योजना तयार करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आपणच नगरविकास विभागाकडे तक्रार करणार आहोत, असा इशारा शेटे यांनी दिला.‘केएसबीपी’वरून वाद : शहरातील चौक सुशोभित करण्यासाठी ‘केएसबीपी’बरोबर करार करण्याच्या प्रस्तावावरून सभेत काँग्रेस-राष्टÑवादी तसेच भाजप-ताराराणी सदस्यांत वाद निर्माण झाला. एकाच संस्थेला काम देण्याऐवजी स्पर्धा होण्यासाठी निविदा मागवा, अशी मागणी कॉँग्रेस-राष्टÑवादीकडून केली गेली तर कोणत्याही विकासकामात विनाकारण अडथळे आणू नका, असे आवाहन ‘भाजप-ताराराणी’कडून करण्यात आले. यावेळी भूपाल शेटे यांनी या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला तर सत्यजित कदम यांनी तो सिद्ध करून दाखवा, असे आव्हान दिले. या वादात शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यावर ताशेरे ओढले गेले.‘केएसबीपी’वरून वाद : शहरातील चौक सुशोभित करण्यासाठी ‘केएसबीपी’बरोबर करार करण्याच्या प्रस्तावावरून सभेत काँग्रेस-राष्टÑवादी तसेच भाजप-ताराराणी सदस्यांत वाद निर्माण झाला. एकाच संस्थेला काम देण्याऐवजी स्पर्धा होण्यासाठी निविदा मागवा, अशी मागणी कॉँग्रेस-राष्टÑवादीकडून केली गेली तर कोणत्याही विकासकामात विनाकारण अडथळे आणू नका, असे आवाहन ‘भाजप-ताराराणी’कडून करण्यात आले. यावेळी भूपाल शेटे यांनी या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला तर सत्यजित कदम यांनी तो सिद्ध करून दाखवा, असे आव्हान दिले. या वादात शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यावर ताशेरे ओढले गेले.