शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या सत्तेसाठी कामाला लागा

By admin | Updated: September 12, 2016 00:58 IST

प्रकाश आवाडे : पक्ष मानणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारी मागण्याची मुभा

इचलकरंजी : कोणत्याही संकटाला तोंड देण्यास काँग्रेस पक्ष समर्थ आहे. कोणी कोणाची शिफारस करण्याची गरज नसून झालं गेलं गंगेला मिळालं असे समजून चुकलेल्यांना माफ करूया. पक्ष मानणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारी मागण्याची मुभा आहे; परंतु एका घरात एकच उमेदवारी दिली जाईल आणि त्याचबरोबर अर्ज करणाऱ्याचाच विचार केला जाईल. आरक्षण कोणतेही असो त्याची तमा न करता नगरपालिकेवर पुन्हा काँग्रेसचा तिरंगा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी इच्छुकांना अर्ज वाटपाचा प्रारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे होते. आवाडे पुढे म्हणाले, मागचा इतिहास उगाळत कोण काय केलं याचा पंचनामा करण्यापेक्षा चुकलेल्यांना व पक्ष कार्याची तयारी असलेल्यांना सोबत घेऊया. काँग्रेस पक्षाने नगरपालिकेच्या माध्यमातून विकासगंगा आणली, पण अलीकडच्या काळात गोरगरिबांच्या हक्कावर गदा आणून राज्य शासनाच्या माध्यमातून पोकळ घोषणाबाजी करीत शुद्ध फसवेगिरी केली जात आहे. जनतेला आता चटके जाणवू लागले असून ती योग्यवेळी उत्तर देईल. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, शहरात पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत चढ-उतार हे असणारच, पण सत्ता नाही म्हणून शांत बसू नका. माफीची दानत ही केवळ काँग्रेसकडेच आहे. अन्य पक्ष केवळ बैठका आणि पोकळ घोषणा करून बोलबाला करीत आहेत. पक्षासह शहराचे अस्तित्व टिकविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले. यावेळी इंटकचे सरचिटणीस शामराव कुलकर्णी, राहुल खंजिरे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रकाशराव सातपुते, सतीश डाळ्या, विलास गाताडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, धोंडीलाल शिरगावे, मुकुंद पोवार, रमेश कबाडे, राहुल आवाडे, महावीर कुरुंदवाडे, चंद्रकांत इंगवले, शशांक बावचकर, अब्राहम आवळे, रवी रजपुते, दिलीप झोळ, रणजित जाधव, श्रीरंग खवरे, के. के. कांबळे, अंजली बावणे, मीनाक्षी माळी, आशादेवी लायकर, नंदाताई साळुंखे, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी : कोणत्याही संकटाला तोंड देण्यास काँग्रेस पक्ष समर्थ आहे. कोणी कोणाची शिफारस करण्याची गरज नसून झालं गेलं गंगेला मिळालं असे समजून चुकलेल्यांना माफ करूया. पक्ष मानणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारी मागण्याची मुभा आहे; परंतु एका घरात एकच उमेदवारी दिली जाईल आणि त्याचबरोबर अर्ज करणाऱ्याचाच विचार केला जाईल. आरक्षण कोणतेही असो त्याची तमा न करता नगरपालिकेवर पुन्हा काँग्रेसचा तिरंगा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी इच्छुकांना अर्ज वाटपाचा प्रारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे होते. आवाडे पुढे म्हणाले, मागचा इतिहास उगाळत कोण काय केलं याचा पंचनामा करण्यापेक्षा चुकलेल्यांना व पक्ष कार्याची तयारी असलेल्यांना सोबत घेऊया. काँग्रेस पक्षाने नगरपालिकेच्या माध्यमातून विकासगंगा आणली, पण अलीकडच्या काळात गोरगरिबांच्या हक्कावर गदा आणून राज्य शासनाच्या माध्यमातून पोकळ घोषणाबाजी करीत शुद्ध फसवेगिरी केली जात आहे. जनतेला आता चटके जाणवू लागले असून ती योग्यवेळी उत्तर देईल. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, शहरात पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत चढ-उतार हे असणारच, पण सत्ता नाही म्हणून शांत बसू नका. माफीची दानत ही केवळ काँग्रेसकडेच आहे. अन्य पक्ष केवळ बैठका आणि पोकळ घोषणा करून बोलबाला करीत आहेत. पक्षासह शहराचे अस्तित्व टिकविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले. यावेळी इंटकचे सरचिटणीस शामराव कुलकर्णी, राहुल खंजिरे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रकाशराव सातपुते, सतीश डाळ्या, विलास गाताडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, धोंडीलाल शिरगावे, मुकुंद पोवार, रमेश कबाडे, राहुल आवाडे, महावीर कुरुंदवाडे, चंद्रकांत इंगवले, शशांक बावचकर, अब्राहम आवळे, रवी रजपुते, दिलीप झोळ, रणजित जाधव, श्रीरंग खवरे, के. के. कांबळे, अंजली बावणे, मीनाक्षी माळी, आशादेवी लायकर, नंदाताई साळुंखे, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.