येथील रोटरी क्लबच्या वतीने आयोजित ऑनलाइन गणेशोत्सव स्पर्धेच्या वितरण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी शैलेंद्र सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन २०२० मध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये नदीवेस जनसेवा मंडळ, अण्णा कावतील, श्री छत्रपती गणेशोत्सव मंडळ, घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये भरत पांडुरंग कोळेकर, रवींद्र बाबूराव गरगटे, विश्वराध्याय महादेव होनमुर्गीकर, रोटरी परिवाराकरिता घरगुती सजावट स्पर्धेत पवनकुमार भैरूलाल अग्रवाल, मदनमोहन रामविलास राठी, घनश्याम जेठानंद सावलानी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
विजयी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. अध्यक्ष अभय यळरुटे यांनी स्वागत व सचिव दीपक निंगुडगेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सत्यनारायण धूत, संतोष पाटील, डॉ. रमेश जठार, श्रीनिवास दबडे, अण्णासाहेब पोवाडी, आदी उपस्थित होते. प्रकाश गौड यांनी आभार मानले.