शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

शिक्षक, संस्थाचालकांकडून काळ्या फिती लावून काम

By admin | Updated: January 8, 2015 00:06 IST

शासनाने दखल न घेतल्यास २ फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालये बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत.

कोल्हापूर : सुधारित आकृतिबंध लागू करावा, पूर्वीप्रमाणे वेतनेतर अनुदान मिळावे, कोणत्याही परिस्थितीत एक तारखेला वेतन मिळावे, शिक्षक भरतीवरील बंदी उठवावी, अशा विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालकांनी आज, मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले. असहकार आंदोलनाची सुरुवात संबंधितांनी केली.शासनाने २ मे २०१२ पासून शिक्षकभरतीवर बंदी आणली आहे. त्यामुळे अनेक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गुणवत्तावाढीवर होत आहे. २३ आॅक्टोबर २०१३ रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर सेवकांसाठी सुधारित आकृतिबंध लागू झाला. तो अन्यायकारक असून रद्द करावा. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय संंबंधित शाळेतील शिक्षकांचे पगार मूळ शाळेतून काढावे. वेतनेतर अनुदान सर्वांना पूर्वीप्रमाणे मिळावे, डी. एड्. व बी. एड्. झालेल्यांना पुन्हा टीईटी देण्याची अट रद्द करावी, अशा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी असहकार आंदोलनातील पहिला टप्पा म्हणून संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून काम केले. यात जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या. मागण्या मान्य होईपर्यंत शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, विभागीय परीक्षा मंडळ, आदींनी बोलाविलेल्या सर्व बैठकींना बहिष्कार टाकणे असे असहकार आंदोलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे टप्पाटप्प्याने आंदोलन तीव्र करू. सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये १३ जानेवारीला बंद ठेवू. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास २ फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालये बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत.- के. बी. पवार, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ