शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा सुशोभीकरणाचे काम ठप्प: पाठपुराव्याची गरज , दोन कोटी २५ लाखांचा निधी अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:53 IST

कळंबा : शहराच्या दक्षिणेस ६३.९३ हेक्टर परिसरात पसरलेल्या, ७.३५ दशलक्ष पाणी साठवण क्षमता असणाºया, कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाºया कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाचे

अमर पाटील ।कळंबा : शहराच्या दक्षिणेस ६३.९३ हेक्टर परिसरात पसरलेल्या, ७.३५ दशलक्ष पाणी साठवण क्षमता असणाºया, कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाºया कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाचे १० कोटी रुपयांचे काम गेले दोन महिने बंद आहे. पहिल्या टप्प्यातील मिळालेल्या ७ कोटी ७५ लाखांच्या मंजूर निधीतून जनावरे धुण्याचा हौद, अडीच कि.मी.चा जॉगिंग ट्रॅक, वृक्षारोपण, बंधारा पिचिंग इतकीच कामे झाली असून, यावर अंदाजे ७ कोटी ५० लाखांचा खर्च करण्यात आला आहे.

सुशोभीकरणाच्या १० कोटींच्या निधीपैकी ७ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर होऊन विविध विकासकामांवर खर्ची पडला. आता उर्वरित दोन कोटी २५ लाखांच्या निधीसाठी निविदाधारक कंपनीस मिळणारा निधी व त्यातून होणारी सुशोभीकरणाची विकासकामे याचा स्वतंत्र प्रस्ताव पालिकेस सादर करावा लागेल. पालिका हा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सादर करेल. प्राधिकरणची मंजुरी मिळताच हा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मंजुरीसाठी जाईल.

या विभागाची मंजुरी मिळताच उर्वरित २ कोटी २५ लाखांचा निधी महापालिकेकडे वर्ग होईल. त्यानंतर उर्वरित सुशोभीकरणाच्या कामास मुहूर्त लागेल.पहिल्या टप्प्यातील मंजूर निधीतील प्रत्यक्षात निविदेतील कामे व झालेली विकासकामे यात तफावत असून, बंधारा पिचिंग व बंधारा पदपथ सुमार दर्जाचा झाला आहे. पालिका आयुक्तांनी या कामाची झाडाझडती घेतली. पिचिंगचे काम पुन्हा करण्यास सांगितले. त्याच्या एक वर्षानंतर दर्जा बघून बिल अदा करण्याच्या सूचना केल्या. सध्या तलाव भरला असल्याने हे काम करता येत नाही. तर उर्वरित कामासाठी निधी नाही. शिल्लक निधी मिळेनासा झाल्याने गेले दोन महिने काम बंद आहे.दहा कोटींचे सुशोभीकरण अंधाराततलावावर बंधारा पिचिंग, प्रवेशद्वार व जॉगिंग ट्रॅक, वृक्षारोपण ही कामे झाली असली तरी पथदिवे नसल्याने एवढे मोठे सुशोभीकरणाचे काम रात्र होताच एकही दिवा नसल्याने अंधारात गडप होते.उर्वरित कामे होणार का?मनोरा दुरुस्ती, अ‍ॅम्पीथिएटर, व्यवस्थापन कार्यालय, स्वच्छतागृहे, मिनी कुस्ती मैदान, पदपथ, पथदिवे, संरक्षक भिंत कामे प्रलंबित आहेत. ७ कोटी ७५ लाखांच्या निधीतील ही कामे आता उर्वरित २ कोटी २५ लाखांच्या निधीत होणार का, हा प्रश्न आहे.देखभालीविना अवास्तव खर्चमुळात दहा कोटींच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जावर नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने बंधारा पिचिंग प्रवेशद्वार काम दोनदा करावे लागले, तर पालिका मालकीच्या तलावावर देखभालीसाठी एकही कर्मचारी नियुक्त नाही, हे दुर्दैव.