शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार हमीतून दीड कोटीची कामे, सहा हजार कामांचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 18:23 IST

रोजगार हमी योजनेतून आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ३७ हजार ६२७ मजुरांनी विविध कामे करून १ कोटी ३९ लाख रुपयांची मजुरी मिळविली. विहिरी खणणे, घरकुले बांधणे, रस्ते, गोठा, वृक्षलागवड, तुतू लागवड, आदी कामांचा समावेश आहे. प्रशासनाने २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ६ हजार २९८ कामांचा आराखडा तयार केला आहे. त्यातील ४३३ कामे सध्या सुरू आहेत.

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार हमीतून दीड कोटीची कामे, सहा हजार कामांचा आराखडाविहिरी, रस्ते, गोठा, फळबाग, वृक्षलागवड, घरकुल, आदींचा समावेश

प्रवीण देसाई

कोल्हापूर : रोजगार हमी योजनेतून आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ३७ हजार ६२७ मजुरांनी विविध कामे करून १ कोटी ३९ लाख रुपयांची मजुरी मिळविली. विहिरी खणणे, घरकुले बांधणे, रस्ते, गोठा, वृक्षलागवड, तुतू लागवड, आदी कामांचा समावेश आहे. प्रशासनाने २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ६ हजार २९८ कामांचा आराखडा तयार केला आहे. त्यातील ४३३ कामे सध्या सुरू आहेत.या योजनेंतर्गत जॉब कार्डधारक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, कर्ता पुरुष नसलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, वननिवासी लाभार्थी यांच्या हातांना कामे देण्यासाठी विविध कामे हाती घेतली आहेत. त्यांचे निकषही ठरवून दिले आहेत.

त्यानुसार जिल्ह्यात तुतूची लागवड, रोपवाटिका, विहिरी खणणे, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले बांधणे, नाडेफ (गांडूळ खत व कंपोस्ट खत तयार करणे), रस्ते, जनावरांचा गोठा, ३३ कोटी वृक्षलागवड, फळबाग लागवड, शौचखड्डा, आदी कामे सुरू आहेत.

आॅक्टोबर महिन्यात ग्रामपंचायत विभागाकडील व शासकीय यंत्रणेकडील मिळून एकूण ४३३ कामे ३७ हजार ६२७ मजुरांनी केली आहेत. कामाप्रमाणे १९५ रुपयांपासून २१० रुपये प्रत्येक दिवसानुसार ही मजुरी देण्यात आली आहे. मेजरमेंट बुक (मोजमाप पुस्तक)मध्ये झालेल्या कामांची नोंद करून झालेल्या कामाच्या मजुरीचे पैसे सातव्या दिवशी मजुराला दिले जात आहेत.

 

आॅक्टोबर महिन्यातील अहवालानुसार ग्रामपंचायतीकडील ४११ कामे झाली असून, ३४२३३ मजुरांनी कामे केली आहेत; तर शासकीय यंत्रणेकडील २२ कामे झाली असून, यामध्ये ३३९४ मजुरांनी काम केले आहे. 

 

‘रोहयो’तून या आर्थिक वर्षासाठी ६२९८ कामांचा प्रस्तावित आराखडा तयार केला आहे. यातील ४३३ कामे सध्या जिल्ह्यात सुरू असून, मागणीनुसार ती लाभार्थ्यांना दिली जाणार आहेत. ज्यांना या योजनेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करावा.- अमित माळी, उपजिल्हाधिकारी (रोहयो)

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी