शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोफायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे महिलांचा आत्महत्येचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 14:23 IST

रोजगार नसल्याने आधीच उपासमारीची वेळ आलेल्या महिलांना जून महिन्यापासून मागील तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते चक्रवाढ व्याजासह भरण्याचा तगादा मायक्रो फायनान्स कंपनीने लावला आहे. त्यामुळे ग्रामीण कष्टकरी महिला अडचणीत आल्या आहेत. महिलांनी आत्महत्येचा इशारा दिला असुन त्यास पूर्णपणे संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीच जबाबदार असेल असेही महिलांनी सांगितले.

ठळक मुद्देमायक्रोफायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे महिलांचा आत्महत्येचा इशारासावर्डे तर्फ असंडोली( ता. पन्हाळा) येथील महिला आक्रमक

कळे  : कोरोनाच्या संसर्गाने झालेल्या लॉकडाऊनमुळे गेले जवळपास पावणेतीन महिने ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांच्या हाताला काम नाही. रोजगार नसल्याने आधीच उपासमारीची वेळ आलेल्या महिलांना जून महिन्यापासून मागील तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते चक्रवाढ व्याजासह भरण्याचा तगादा मायक्रो फायनान्स कंपनीने लावला आहे. त्यामुळे ग्रामीण कष्टकरी महिला अडचणीत आल्या आहेत. महिलांनी आत्महत्येचा इशारा दिला असुन त्यास पूर्णपणे संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीच जबाबदार असेल असेही महिलांनी सांगितले.सावर्डे तर्फ असंडोली( ता. पन्हाळा) येथे गुरुवार (दि. ११) रोजी सकाळी नऊ वाजता एका खासगी मायक्रो फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी महिलांनी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांची वसुली करण्यासाठी आला होता. त्यावेळी प्रक्षुब्ध झालेल्या महिलांनी त्यास इशारा दिला.कोरोनामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाने गत तीन महिने हप्ते भरणे बंद होते, तथापि आज गुरुवार ( दि.११) रोजी संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने गत तीन महिन्यांचे हप्ते चक्रवाढ व्याज पद्धतीने त्वरित भरा असा तगादा लावल्याने महिला आक्रमक झाल्या व त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला.गेले तीन महिने कोरोनामुळे या कष्टकरी महिलांच्या हाताला रोजगार नाही. पुढील चार महिने पावसामुळे रोजगार मिळणार नाही. संबंधित कंपनीने आम्हास सप्टेंबर अखेर हप्ते भरण्यास सुट द्यावी, चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करू नये, अन्यथा काही महिला आत्महत्या करतील व त्यास संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीच जबाबदार असेल असाही इशारा महिलांनी दिला.

ग्रामीण भागातील आम्ही कष्टकरी महिलांनी एकत्र येऊन संसाराचा गाडा चालवण्यासाठी एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आहे. कोरोनामुळे गेले तीन महिने हप्ते भरणे बंद होते. थकित हप्ते आता चक्रवाढ व्याज पध्दतीने आकारून हप्ते भरण्याचा कंपनीने तगादा लावला आहे. "कर्जमुक्ती" करुन शासनाने महाराष्ट्रातील सर्वच कष्टकरी महिलांची या विळख्यातुन मुक्तता करावी.अलका भिकाजी काळे.सावर्डे तर्फ असंडोली, (ता. पन्हाळा).

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBanking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर