शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

उद्यापासून महिला फुटबॉलचा थरार ; इंडियन वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धा-रायझिंग स्टुडंट विरुद्ध जे अ‍ॅँड के स्टेट संघ यांच्यात लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:33 IST

कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर उद्या, शनिवारी सकाळी साडेआठ वाजता इंडियन वुमेन्स फुटबॉल लीग स्पर्धेतील पात्रता फेरीच्या सामन्यांना प्रारंभ होत आहे

कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर उद्या, शनिवारी सकाळी साडेआठ वाजता इंडियन वुमेन्स फुटबॉल लीग स्पर्धेतील पात्रता फेरीच्या सामन्यांना प्रारंभ होत आहे. स्पर्धेची सुुरुवात ओरिसाच्या रायझिंग स्टुडंट क्लब विरुद्ध जम्मू-काश्मीरच्या जे अ‍ॅँड के स्टेट स्पोर्टस कौन्सिल या संघांत होणार आहे. स्पर्धेकरिता गुरुवारी सायंकाळपर्यंत आठ संघ कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वतीने या स्पर्धा प्रथमच ‘के.एस.ए.’च्या संयोजनाखाली कोल्हापुरात भरविल्या जात आहेत. या देशातील नामांकित महिला फुटबॉलपटू आपल्या खेळाचा करिश्मा पात्रता फेरीतील सामन्यांत दाखविणार आहेत. या स्पर्धेतून मुख्य स्पर्धेसाठी दोन संघ पात्र होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

रायझिंग स्टुडंट क्लब, बडोदा फुटबॉल संघ, इंदिरा गांधी अकॅडमी स्पोर्टस, जे अ‍ॅँड के संघ, इंडिया रश सॉकर, ईस्टर्न स्पोर्टिंग युनियन, युनायटेड वॉरियर्स, क्रिप्शा हे संघ कोल्हापुरात दाखल झाले असून काही संघांतील खेळाडूंनी सायंकाळी पोलो मैदान व पोलीस मुख्यालयाच्या मैदानात सराव केला. मणिपूरच्या ईस्टर्न व क्रिप्शा या दोन संघांत भारतीय संघातील जवळजवळ ८० टक्के फुटबॉलपटू आहेत. त्यांच्या खेळाचे प्रदर्शन उत्कृष्ट आहे. त्यामुळे त्यांचा खेळ पाहण्याची संधी स्थानिक महिला फुटबॉलपटूंना मिळणार आहे. याशिवाय १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकातही तेथील पाच युवक भारतीय संघातून खेळले होते. त्यामुळे मणिपूरचा फुटबॉल पॅटर्न त्यांच्या सामन्यातून पाहण्यास नक्कीच मिळणार आहे.कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरातील पोलो मैदानावर इंडियन वुमेन्स लीग स्पर्धेत सहभागी झालेल्या मणिपूरच्या संघाने गुरुवारी सायंकाळी सराव केला. 

 

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूर