मेजर ध्यानचंद हाॅकी स्टेडियम (धनराज पिले सराव स्टेडियम) येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीत ३५ महिला व पुरुष सहभागी झाले होते. निवड झालेल्या संघात कनिष्ठ मुले : तन्मय संजय जाधव, विवेक दीपक दुर्गुळे, प्रणम महादेव चौगुले, आदित्य रामचंद्र कुंभार, सिद्धार्थ भरत मोरे, ओंकार बजरंग भोसले, राजरत्न पिंटू कांबळे, तर राखीव म्हणून स्वप्निल सतीश कुऱ्हाडे, यशवर्धन दत्तात्रय गुरव यांचा समावेश आहे.
वरिष्ठ गट महिला संघ असा, वैष्णवी विठ्ठल भोईटे, शिवानी रामचंद्र भोईटे, हर्षदा बाबूराव लाड, साक्षी नामदेव झांजगे, प्रज्ञा भीमराव कांबळे, तनया संभाजी संकपाळ, अनुराधा शिरीष गुले, गौरी सर्जेराव शिंदे यांचा समावेश आहे. या निवड चाचणीत महाराष्ट्र क्रीडा मंडळ, शाम स्पोर्टस्, त्र्यंबोली प्ले काॅर्नर, देवगिरी फायटर्स, शाहू फौंडेशन, छावा मित्र मंडळ, पद्मा पथक, डीएनएफ, इचलकरंजी, प्रिन्सेस हाॅकी, ज्योतिर्लिंग क्रीडा मंडळ या संघांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही निवड चाचणी अनिल परांडेकर, राहुल गावडे, मोहन भांडवले, सागर जाधव, संदीप शिंदे, गणेश पोवार या मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.
फोटो : १२०९२०२१-कोल-हाॅकी
ओळी : मेजर ध्यानचंद हाॅकी स्टेडियम येथे रविवारी सकाळी बालेवाडी (पुणे) येथे होणाऱ्या हाॅकी इंडिया स्पर्धेसाठी राज्य संघ निवड चाचणीसाठी निवडण्यात आलेले जिल्हा संघासोबत पदाधिकारी उपस्थित होते.