शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा आहार

By admin | Updated: March 17, 2016 00:42 IST

डॉ. शिल्पा जाधव

‘जागतिक महिला दिन’ नुकताच झाला. यानिमित्त यशस्वी महिलांचे सत्कार, स्त्रियांच्या समस्यांवर चर्चा, समान अधिकारांची मागणी, विविध मेळावे, निरनिराळ्या विषयांवर परिसंवाद, रॅलीज, वगैरे कार्यक्रम साग्रसंगीतपणे पार पडले. सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया हिरिरीने भाग घेत आहेत. प्रगती करत आहेत. राजकारण, शिक्षण, सरकारी नोकऱ्या, आदी सर्व ठिकाणी स्त्रियांसाठी आरक्षण आहे. बरं! यानंतर स्त्रियांना समान हक्क मिळाले का?समाजाने जरी महिलांना स्वातंत्र्य, समान हक्क देऊ केले तरी ते उपभोगण्याची मानसिकता महिलांमध्ये आहे का, ही विचार करण्याची गोष्ट आहे. घराबाहेर सर्व क्षेत्रे काबीज करणाऱ्या स्त्रिया घरामध्ये स्वत:कडे कितीशा आदराने पाहतात? स्वत:चे आरोग्य, आवडीनिवडी यांना किती महत्त्व देतात? जरी अर्धे आयुष्य स्वयंपाकघरात जात असलं तरी सर्वांना वाढून उरेल तेच खायचं आणि काही वाया जाऊ नये म्हणून संपवायचं, या मानसिकतेतून आजची स्त्री एकविसावं शतक उजाडलं तरी बाहेर येत नाहीय. मी ज्या स्त्रियांना भेटले, आहारतज्ज्ञ म्हणून सल्ला दिला, त्यांच्या बोलण्यात ही असहायता स्पष्ट दिसत असते. घरातील मुलांच्या, नवऱ्याच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवल्या, तर त्यासाठी काहीही करण्याची महिलांची तयारी असते; मात्र त्यांना स्वत:च्या जेवणाच्या वेळा, सवयी बदलण्यास सांगितल्या, तर त्यासाठी त्या असमर्थता दर्शवितात. सकाळी झोपेतून जागे झाल्यापासून स्त्रियांच्या मनात घरातील कामांचे नियोजन, देवपूजा, स्वयंपाक, डबे, पाहुणे, बाजारहाट अशा कामांची यादी चालू असते. परंतु, त्यामध्ये आपण काय खाल्लं आहे, कधी खाल्लं आहे, हे मात्र त्या विसरून जातात अथवा त्याकडे दुर्लक्ष करतात. कितीतरी स्त्रियांच्या पोटात दुपारी बारा वाजेपर्यंत चहाशिवाय काहीही जात नाही. दुपारच्या जेवणानंतर काहीजणी कामासाठी बाहेर पडतात, तर काहीजणी झोप घेतात. परत संध्याकाळी टी. व्ही.समोर बसून काहीतरी अरबट चरबट खाणे होते. पुन्हा रात्री घरातील सर्व मंडळी येईपर्यंत वाट पाहायची आणि त्यानंतर रात्रीचे जेवण, असा साधारणपणे दिनक्रम असतो. जेव्हा आपण सकाळी उठतो, तेव्हा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी जागी होते. तिला भूकही लागलेली असते आणि तिला कामही करायचं असतं. त्यामुळे सकाळी उठल्याउठल्या लवकरात लवकर काहीतरी खाल्लं पाहिजे आणि चहा हे त्यावरचं उत्तर नाही. चहामुळे भुकेची भावना विरून जाते. आपण नाष्टा पुढे ढकलतो. सकाळी लवकर नाष्टा केल्यास दिवसभरात अचानक खूप भूक लागणे, पित्त होणे, मूडस् बिघडणे या गोष्टींचा त्रास होत नाही. नाष्ट्यामध्ये बाहेरून आणलेले ब्रेड, बिस्किटे वगैरे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या एखाद्या धान्याचा पदार्थ, दूध, फळ खाल्लेलं उत्तम! दुपारच्या जेवणामध्ये भात, चपाती अथवा भाकरीसोबत हिरव्या पालेभाज्या, कढी, डाळी, उसळी, ताक किंवा दही, सॅलडस् अशा पदार्थांचा समावेश असू द्यावा. मुले, नवरा घराबाहेर आहेत किंवा तिकडेच जेवतात म्हणून कितीतरी स्त्रिया स्वत:साठी स्वयंपाक करण्याचा व खाण्याचा कंटाळा करतात. जेवणाची एखादी वेळ चुकविल्यास आपली दैनंदिन पोषणमूल्यांची गरज पूर्ण होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. संध्याकाळी चिप्स, चिवडा या गोष्टींपेक्षा सुका मेवा, फळे, लाह्या, फुटाणे अशा पदार्थांचे सेवन करावे. रात्रीचा आहार शक्यतो हलका असावा. त्यामध्ये तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, लोणची खाणे टाळावे. याउलट प्राणिजन्य प्रथिने (उदा. अंडी, मासे, चिकन) खाण्यासाठी संध्याकाळची वेळ योग्य ठरते. आपला आहार हे आपले इंधन आहे, हे ध्यानात घेऊन प्रत्येकाने आपल्या आहारविहाराची काळजी घेतली तर येणारा प्रत्येक दिवस महिला दिनच असेल; नव्हे महिला युगच असेल, हे निश्चित!!