ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दिलीप सुतार यांच्या पुढाकाराने साने गुरुजी शिक्षण संस्था, माऊली महिला सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सुरेंद्र आलासे सभागृहात महिला उद्योजकता शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे येथील ओज आयुर्वेदिक संस्थेचे संस्थापक डॉ. पराग पटवर्धन होते.
पटवर्धन यांनी मानवी जीवनातील आयुर्वेदाचे महत्त्व, उत्पादनाची माहिती आणि उपयोगिता स्पष्ट केली, तर हेमंत मुळीक व उमेश शेट्ये यांनी संवाद कौशल्ये व विक्री व्यवसाय व्यवस्थापन याबद्दल महिलांना माहिती दिली. यावेळी सुजाता पाटील, स्नेहल उमडाळे, पद्माराणी पाटील, सारिका पाटील, भाग्यश्री अडसूळ, अजित पाटील, बाबासाहेब नदाफ यांच्यासह महिला बचत गट प्रशिक्षणात सहभागी झाले होते. स्वागत प्रा. दिलीप सुतार यांनी केले. मुख्याध्यापिका रोहिणी निर्मळे यांनी आभार मानले.
फोटो - १२०१२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे महिला उद्योजकता शिबिरात माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. पराग पटवर्धन, प्रा. दिलीप सुतार उपस्थित होते.