शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शिक्षक पुरस्कारात महिलांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:43 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीद्वारे दिले जाणारे सन २०१९-२० सालातील ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार, ‘विशेष पुरस्कार’ तसेच ‘आदर्श ...

ठळक मुद्देमहापालिका शिक्षक पुरस्कारात महिलांची बाजीप्राथमिक शिक्षण समितीद्वारे दिले जाणारे पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीद्वारे दिले जाणारे सन २०१९-२० सालातील ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार, ‘विशेष पुरस्कार’ तसेच ‘आदर्श सेवक’ पुरस्कार बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे पुरस्कारप्राप्त १२ शिक्षकांमध्ये सात महिला शिक्षकांचा समावेश आहे. पुरस्काराच्या यादीतही महिलांनी बाजी मारली आहे.महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत प्रत्येक वर्षी महापालिका शाळेतील, तसेच खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पुरस्कार दिले जातात. त्याची घोषणा शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. सन २०१९-२० सालातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी बुधवारी सायंकाळी शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे व प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी जाहीर केली.महापालिका शाळेतील स्मिता कारेकर, सुरेश केरुरे, द्रोणाचार्य पाटील, कल्पना काटकर, शांतादेवी कोळेकर या शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ तर जयेंद्र चव्हाण यांना ‘विशेष पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

खासगी प्राथमिक शाळेतील गोरख वातकर, सीमा कुलकर्णी, नंदीनी कोंडेकर, छाया हिरुगडे, अनिल खोत यांना ‘आदर्श शिक्षक’ तर सविता गिरी यांना ‘विशेष पुरस्कार’ जाहीर झाला आहे. याशिवाय श्रीकांत शिंदे व दशरत पाटील यांना ‘आदर्श सेवक’ पुरस्कार जाहीर झाला आहे.पुरस्कारप्राप्त शिक्षकांची निवड करण्याकरिता अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्राचार्य आय. सी. शेख, प्रा. प्रभाकर हेरवाडे, प्रशासन अधिकारी शंकर यादव यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने प्राप्त अर्जांची छाननी करून अंतिम निवड संबंधित शिक्षकांची मुलाखत घेऊन केली. लवकरच विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक -- महापालिका प्राथमिक शाळा१. स्मिता समीर कारेकर, सहायक शिक्षिका-ल. कृ. जरग विद्यालय.२. सुरेश आप्पा करुरे, सहायक शिक्षक-गोविंद पानसरे विद्यालय.३. जयेंद्र गणपतराव चव्हाण, कला शिक्षक-शिवाजी विद्यालय, जाधववाडी४. द्रोणाचार्य विष्णू पाटील, सहा. शिक्षक-वि. स. खांडेकर विद्यामंदिर५. श्रीमती कल्पना विनायक काटकर, सहा. शिक्षिका-टाकाळा विद्यामंदिर६. श्रीमती शांतादेवी कृष्णा कोळेकर, सहा. शिक्षिका-हिंद विद्यामंदिर- खासगी प्राथमिक शाळा -१. गोरख पांडुरंग वातकर, सहा. शिक्षक-जीवन कल्याण विद्यालय२. सीमा प्रदीप कुलकर्णी, सहा. शिक्षिका-शेलाजी वन्नाची विद्यालय३. नंदिनी हिंदुराव कोंडेकर, प्रभारी मुख्याद्यापिका-शाहू दयानंद मराठी शाळा४. छाया रघुनाथ हिरुगडे, मुख्याद्यापिका-यशवंतराव भाऊराव पाटील, विद्यालय५. सविता भालचंद्र गिरी, सहा शिक्षिका-सरस्वती चुनेकर विद्यामंदिर६. अनिल शंकर खोत, सहा. शिक्षक-विद्यामंदिर, शाहूपुरीआदर्श सेवक पुरस्कार -१. श्रीकांत ना. शिंदे, वीर कक्कया विद्यामंदिर२. दशरथ पाटील, संत रोहिदास विद्यामंदिर

 

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनEducation Sectorशिक्षण क्षेत्रMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर