म्हाकवे : भविष्यात पैसा हाच परमेश्वर आणि तंत्र - यंत्र हे धर्मगुरू असणार आहेत. त्यामुळे महिलांनी केवळ बचत गटातील कर्ज, अनुदान यावर अवलंबून न राहता स्वत: उद्योजक होऊन घरीच लहान मोठ्या उद्योगांची निर्मिती करा, तसेच आपल्या मुलांनाही व्यावसायिक शिक्षण द्या, असे आवाहन कांचनताई परुळेकर यांनी केले.राजकीय नेते मुलांना नोकरी लावतील हे मनातून काढा, असे सदाशिवराव मंडलिक व हसन मुश्रीफ यांचे नाव घेऊनच त्यांनी सांगितले. म्हाकवे (ता. कागल) येथील सत्संग ाखानमालेत ‘महिलांनो स्वयंसिद्ध व्हा..’, या विषयावर त्या बोलत होत्या.महिलांना स्वयंसिद्ध होऊ द्या, त्याही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासाला साथ देतील, असा विश्वास व्यक्त करून सौ. परुळेकर म्हणाल्यायावेळी शशिकांत खोत, सिद्धगोंडा पाटील, विजय देवणे, माजी सरपंच वर्षा पाटील, श्रीकांत पाटील, रामचंद्र पाटील, आदी उपस्थित होते. तर महिलांचा स्वतंत्र पक्ष !कागल तालुक्यातील जहरी राजकीय परिस्थितीचा समाचार घेताना परुळेकर म्हणाल्या, दोन मस्तवाल हत्तीच्या भांडणात गवत गंजीचे मोठे नुकसान होते. त्यामुळे महिलांनी राजकारणाला मूठमाती देऊन आपली वाट आपणच चालायची. स्वकर्तृत्व आणि स्वबळावर स्वयंसिद्ध होऊन महिलांचा स्वतंत्र पक्षच तयार करावा, असे आवाहन करताच उपस्थित महिलांनी जोरदार टाळ्यांनी दाद दिली.
महिलांनो, उद्योजक व्हा
By admin | Updated: January 16, 2015 23:43 IST