शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

तपासी अधिकारी झा यांची साक्ष

By admin | Updated: June 12, 2015 00:54 IST

महिला पोलीस लैंगिक शोषण प्रकरण : संशयित आरोपींची १७ जूनला उलटतपासणी

कोल्हापूर : कोल्हापूर पोलीस दलामध्ये २०११ मध्ये झालेल्या महिला पोलीस लैंगिक शोषण प्रकरणी तपासी अधिकारी मैथिली झा यांची गुरुवारी प्रथम वर्ग न्यायाधीश एम. बी. तिडके यांच्यासमोर साक्ष झाली. कोल्हापूर पोलीस दलामध्ये २०११ मध्ये नागपूर येथून ट्रेनिंग संपवून आलेल्या महिला कॉन्स्टेबलचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी संशयित कॉन्स्टेबल युवराज कांबळे याच्याविरोधात पीडित महिला कॉन्स्टेबलने २४ जुलै २०११ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक यशस्वी यादव यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दुर्याेधन पवार यांच्याकडे दिला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासांत संशयित म्हणून तत्कालीन गृह पोलीस उपअधीक्षक विजय परकाळे व शाहूपुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे यांचीही नावे पुढे आली. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले. गृहविभागाने या प्रकरणाचा तपास नाशिकच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक मैथिली झा यांच्याकडे वर्ग केला. झा यांनी कोल्हापुरात येऊन याप्रकरणी पीडित महिला कॉन्स्टेबल, तिची आई, पोलीस मित्रांसह काही पोलीस, ‘सीपीआर’मध्ये घेण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल व डॉक्टरांचा जबाब घेतला. त्याचबरोबर संशयित आरोपी कांबळे याच्यासह विजय परकाळे व ज्ञानेश्वर मुंडे यांचेही जबाब घेतले. तसेच फिर्यादीसह संशयित आरोपींचे कॉल डिटेक्टही घेतले. या प्रकरणाचा संपूर्ण तपास करून त्यांनी प्रथम वर्ग न्यायाधीश तिडके यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. फिर्यादीच्या वतीने सरकारी वकील अशोक रणदिवे, तर आरोपींच्या वतीने संपत पवार काम पाहत आहेत. अ‍ॅड. पवार यांनी सरकारी पक्षाच्या बारा साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. त्यामध्ये तपास अधिकारी मैथिली झा यांची गुरुवारी सुमारे ४५ मिनिटे साक्ष घेतली. नागपूर येथे प्रशिक्षणासाठी सुमारे ७२ मुली गेल्या होत्या. यांतील काही मुलींचेही जबाब घेण्यात आल्याचे समजते. सरकारी पक्षाच्या वतीने पुरावा पूर्ण झाला असून, १७ जूनला आरोपींचा उलट तपास घेतला जाणार आहे. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालय यावर अंतिम निर्णय देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलीस अधीक्षकांशी चर्चान्यायालयात साक्ष झाल्यानंतर मैथिली झा यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची पोलीस मुख्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.