शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचे बांधकाम न करताच पैसे उचलले

By admin | Updated: September 16, 2014 23:26 IST

शाहूवाडी तालुक्यातील प्रकार : ४५ लाख रुपये उचलल्याचे माहिती अधिकारात उघड

नवे पारगाव : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गावर शाहूवाडी तालुक्याच्या हद्दीत धोक्याच्या ठिकाणी दोन पुलांची बांधकामे पूर्ण न करताच ४५ लाख४० हजार रुपये रक्कम उचलली गेली असल्याची घटना उघडकीस आली. सार्वजनिक बांधकाम विभागातील एका सहायक अभियंत्याने माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितल्याने ही बाब उजेडात आली. राज्याचे आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी सा. बां. विभागाच्या सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत.याबाबतचे सविस्तर वृत्त असे, राज्य अपघात निवारण समितीचे सचिव तांबे यांनी ४ ते ५ आॅगस्ट २००० मध्ये रत्नागिरी-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्राची पाहणी केली. राज्याच्या अपघात निवारण समितीचा अहवाल हा सा. बां. विभागासाठी आदेश मानला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातील करंजोशी ते बहिरेवाडी (ता. शाहूवाडी) खिंड दरम्यानच्या दोन ठिकाणी अरुंद रस्ते व अत्यंत धोकादायक वळणाच्या ठिकाणी पूल बांधकामाच्या सूचना अपघात निवारण समितीने दिल्या होत्या. सा. बां. विभागाने प्रथम प्राधान्याने व तत्काळ हे काम करण्याचे निर्देश दिले.सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम कागदावरच केले. या दोन्ही ठिकाणी पुलाच्या कामासाठी अनुक्रमे ३० लाख ३५ हजार व १५ लाख ५ हजार खर्ची पडले आहेत. प्रत्यक्षात ही कामे झालेलीच नाहीत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील एका सहायक अभियंत्याने माहितीच्या अधिकाराखाली २१ जुलै २०१० रोजी माहितीची मागणी अपिलीय प्राधिकाऱ्याकडे मागितली. प्रत्यक्षात काम न करताच रक्कम उचलली गेल्याने गेली. चार वर्षे बांधकाम विभाग माहिती देऊ शकले नाही. शेवटी अपीलकर्त्याने राज्य माहिती आयुक्तांकडे धाव घेतली.राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी राज्याच्या बांधकाम विभागाच्या सचिवांना चौकशीचे आदेश दिले. आदेशात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधितांविरुद्ध जबाबदारी निश्चित करावी, दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी व अपीलकर्त्यास तत्काळ माहिती द्यावी.या न झालेल्या कामाचे ४५ लाख ४० हजार उचलले गेल्याने कशी माहिती सादर करायची याबाबत सा. बां. विभाग चांगलाच गोत्यात आला आहे. त्यांच्याच विभागातील एकाने भ्रष्टाचाराविरुद्ध एक पाऊल पुढे टाकल्याने या विभागात चांगलीच खळबळ माजली आहे. बांधकाम विभागात सेवा करीत असताना गेली २९ वर्षे या विभागातील गैरप्रकार व भ्रष्टाचाराबद्दल एकाकी लढणाऱ्या ‘त्या’ सहायक अभियंत्याने माहिती मागितल्याने व चौकशी सुरू झाल्याने त्यांना त्रास देणे सुरू केले आहे. पदोन्नतीचे कारण दाखवून त्या अभियंत्याची अखेर नागपुरात बदली केली आहे. (वार्ताहर)