शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

‘रेसिडेन्सी क्लब’चा नावलौकिक वाढवणार-- ‘लोकमत’ला सदिच्छा भेट; आऊटडोअर गेमसाठी प्रकल्प उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:16 IST

कोल्हापूर : देशभरातील ४३ क्लबशी करारबद्ध असलेल्या ‘रेसिडेन्सी क्लब’ची असलेली प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी निवडणुकीत उतरलो होतो

ठळक मुद्दे नूतन संचालकांची ग्वाही :पुणे, मुंबई, राजस्थान, कर्नाटक, गोवा येथील ४३ क्लबशी करार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशभरातील ४३ क्लबशी करारबद्ध असलेल्या ‘रेसिडेन्सी क्लब’ची असलेली प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी निवडणुकीत उतरलो होतो. सभासदांनी आमच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याने क्लबचा नावलौकिक वाढवणारा कारभार करू, अशी ग्वाही नूतन संचालकांनी दिली.

‘रेसिडेन्सी क्लब’च्या निवडणुकीत ‘प्रोगे्रसिव्ह ग्रुप १९९२’चे १५ पैकी १३ उमेदवार विजयी झाले. या नूतन संचालकांनी बुधवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयास सदिच्छा भेट देऊन संपादक वसंत भोसले यांच्याशी सविस्तर चर्चा केली.या आघाडीचे नेते सतीश घाटगे म्हणाले, मतदारांसमोर एक भूमिका घेऊन गेलो. कुठेही नकारात्मक प्रचार करायचा नाही, कुणावरही आरोप करायचा नाही, असेही आम्ही निश्चित केले होते. मात्र, आमच्या मंडळींवर बिनबुडाचे आरोप झाल्यानंतर आम्ही त्यालाही संयमी भाषेत उत्तर दिले.

आता सत्तारूढ आणि विरोधक असा विषय राहणार नाही. सर्वजण एकदिलाने काम करणार आहोत. ‘रेसिडेन्सी प्रेस्टीन’ हा एक प्रकल्प आमच्या डोळ्यासमोर आहे. शहराबाहेर मोठी जागा घेऊन तेथे आऊटडोअर गेम सुरू करण्याचा मानस आहे. सध्या क्लबमध्ये केवळ इनडोअर गेम सुरू आहेत. मात्र, क्लब हा मुळात खेळासाठीच होता याची जाणीव ठेवत कोल्हापूरच्या युवा खेळाडूंना घडविण्यासाठी हा प्रकल्प उभारणार आहे. यासाठी आमच्याकडे सध्या असलेल्या १५ प्रशिक्षकांनाच अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रकल्प सभासदांनादेखील तो पसंतीस पडेल, असा विश्वास व्यक्त केला.

माजी सचिव अमर गांधी म्हणाले, विरोधकांनी प्रचारावेळी एकच बाजू सांगितली. त्यांनी केवळ जावक नोंदवहीतील माहिती दिली. आवक नोंदवहीतील माहिती दिली नाही; परंतु सूज्ञ सभासदांनी निर्णय दिला आहे. सध्या क्लबमध्ये १0 खोल्या आहेत. आणखी नऊ खोल्यांचे काम सुरू आहे. पुणे, मुंबई, राजस्थान, कर्नाटक, गोवा येथील ४३ क्लबशी करार केला असल्याने अनेक मान्यवर क्लबची सेवा घेतात. त्या दर्जेदार असल्याचा अभिप्राय मिळत आहे. सभासदांच्या मुलांनाही सेवा देण्यात येणार आहे.चर्चेत ॠतुराज इंगळे, संचालक नरेश चंदवाणी, शीतल भोसले, विक्रांत कदम, केदार हसबनीस, बसवराज खोबरे यांनी भाग घेतला. यावेळी सचित गांधी उपस्थित होते.कोल्हापूर येथील ‘रेसिडेन्सी क्लब’च्या नूतन संचालकांनी बुधवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी संचालक शीतल भोसले, विक्रांत कदम, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, अमर गांधी, सतीश घाटगे, ॠतुराज इंगळे, नरेश चंदवाणी, केदार हसबनीस, सचित गांधी उपस्थित होते.