शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

‘महावितरण’ची विजयी सलामी

By admin | Updated: July 9, 2015 00:31 IST

अखिल भारतीय कबड्डी : महापारेषणचा ७ गुणांनी पराभव

कोल्हापूर : महावितरण कंपनीने महापारेषण संघाचा ३३ विरुद्ध ७ गुणांनी पराभव करीत अखिल भारतीय वीज क्रीडा नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित व महावितरणतर्फे प्रथमच घेतल्या जाणाऱ्या चाळिसाव्या अखिल भारतीय वीज क्रीडा कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्पर्धेचे उद्घाटन ‘महावितरण’चे कार्यकारी संचालक (एचआर) नीलेश गठणे यांच्या हस्ते व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले. मुस्कान लॉन येथे बुधवारी सकाळी स्पर्धेतील पहिला सामना महावितरण विरुद्ध महापारेषण या दोन वीज कंपन्यांमध्ये झाला. सामन्याच्या प्रारंभापासून महावितरणच्या देवेंद्र शिंदे, नीलेश अवचट, किरण देवाडे यांनी उत्कृष्ट चढाई करीत महापारेषण संघाविरोधात दबाव निर्माण केला होता. सामन्याच्या पहिल्या सत्रात महावितरणने २२ गुणांची आघाडी घेतली; तर महापारेषणकडून केवळ चार गुण कमावले होते. दुसऱ्या सत्रात महावितरणने ही आघाडी वाढवीत ३३ गुणांपर्यंत नेली, तर महापारेषण संघाला केवळ तीन गुणांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे हा सलामीचा सामना महावितरणने ३३ विरुद्ध ७ गुणांनी जिंंकत स्पर्धेत आघाडी घेतली.स्पर्धेचा अन्य निकाल असा :तमिळनाडू वीज कंपनीने छत्तीसगड वीज कंपनीच्या संघावर ३३ विरुद्ध ११ गुणांनी मात केली. यामध्ये अर्जुन पुरस्कार विजेत्या पी. गणेशन याने उत्कृृष्ट चढाई व बचाव करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून देत विजयाला हातभार लावला. तेलंगणाने टाटा पॉवर संघाचा ४३ विरुद्ध २० गुणांनी पराभव केला. चौथ्या सामन्यात पंजाब वीज कंपनीच्या संघाने तेलंगणा वीज कंपनीविरोधात ४० विरुद्ध ४ गुणांची आघाडी घेत एकतर्फी मात केली. दुपारच्या सत्रात बीजीएस दिल्ली वीज कंपनीच्या संघाने आंध्रप्रदेश वीज कंपनी संघाचा ४५ विरुद्ध १० गुणांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात महापारेषण वीज संघाने महाजनको संघाचा ३६ विरुद्ध १२ गुणांनी पराभव केला. उत्तर प्रदेश वीज कंपनीने दिल्ली वीज कंपनीचा ३७ विरुद्ध २५ गुणांनी पराभव केला; तर दिल्ली ट्रॅन्स कंपनीने टाटा पॉवरवर २९ विरुद्ध १६ गुणांनी मात केली. अखेरच्या सामन्यात कर्नाटक वीज कंपनीने उत्तराखंडचा ४३ विरुद्ध ८ गुणांनी पराभव केला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महावितरणचे कार्यकारी संचालक (एचआर) नीलेश गठणे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मार्गदर्शन केले. मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी प्रास्ताविक केले.अखिल भारतीय वीज क्रीडा नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित चाळिसाव्या अखिल भारतीय वीज क्रीडा कबड्डी स्पर्धेचे बुधवारी सकाळी उद्घाटन करताना महावितरणचे कार्यकारी संचालक (एचआर) नीलेश गठणे. सोबत मुख्य अभियंता शंकर शिंदे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यावेळी उपस्थित होते.