शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:24 IST

नुकसानग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या असून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अटी, शर्ती बाजूला ठेवून शेतकरी, बागायतदार, मच्छिमार यांना नुकसान भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे. असे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील!आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन ; कणकवली तालुक्यासह केला सिंधुदुर्ग दौरा

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत आम्ही सर्वच राजकीय नेते एकत्र येऊन विविध ठिकाणी पाहणी करीत आहोत. या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या असून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अटी, शर्ती बाजूला ठेवून शेतकरी, बागायतदार, मच्छिमार यांना नुकसान भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे. असे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले.कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी आणि 'क्यार' वादळ यामुळे शेतकरी आणि मच्छिमारांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी रविवारी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांसह केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.कणकवली तालुक्यातील खारेपाटण, तळेरे, नांदगाव याठिकाणी आदित्य ठाकरे यांनी शेती नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली.यावेळी खासदार विनायक राऊत , पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, सिंधुदुुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर , जिल्हाप्रमुख संजय पडते, सुशांत नाईक, शैलेश भोगले, हर्षद गावडे , गीतेश कडू आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेsindhudurgसिंधुदुर्ग