शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

गौरवशाली ‘विक्रांत’च्या प्रेमळ आठवणी पुन्हा एकदा चाळवणार!

By admin | Updated: January 13, 2015 00:10 IST

सन १९६५ व १९७१ साली पाकिस्तान लढाई व गोवा मुक्ती संग्रामात विक्रांतने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

जावेद शेख - शृंगारतळी -भारतीय नौदलाच्या गौरवशाली कामगिरीची साक्षीदार असणारी आयएनएस ‘विक्रांत’ पहिल्या विमानवाहू युध्दनौकेने देशाच्या सुरक्षेसाठी मोलाचे योगदान देऊन इतिहासात व लोकांच्या मनातही कायमचे नाव कोरून निरोप घेतला. भारतीय मनात घर केलेल्या या विक्रांतची हुबेहूब प्रतिकृती या नौकेचे एक साक्षीदार निवृत्त कॅप्टन हमीद मुकादम यांनी साकारली आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील मुलांना विक्रांत जहाज कशा स्वरूपाचे होते़ याची विस्तृत माहिती मिळावी, या हेतूने मुंबई पोर्ट ट्र्रस्टमधील डेजर विवेक नावाच्या जहाजावरील सेवानिवृत्त कॅप्टन हमीद मुकादम यांनी विक्रांतची साडेपाच फुटाची हुबेहूब प्रतिकृती बनवली आहे. प्रजासत्ताक दिनी विक्रांत येथील जिल्हा परिषद ऊर्दू शाळेला भेट स्वरूपात देण्यात येणार असल्याचे मुकादम यांनी सांगितले़ कॅप्टन मुकादम यांनी आपल्या नोकरीच्या कारर्कीदीत विक्रांतला अगदी जवळून पाहिले आहे. जहाजाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यावर तरंगणारे हे एक प्रकारे शहरच होते. ज्यामध्ये ३० लढावू विमाने, सहा हेलिकॉप्टर्स, १६०० नौसैनिक कायमचे तैनात असायचे. सन १९६५ व १९७१ साली पाकिस्तान लढाई व गोवा मुक्ती संग्रामात विक्रांतने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. २८ नॉटिकल तासी वेग मर्यादा, २४ मेगावॅट ऊर्जेने सज्ज असणारे विक्रांत जहाज सन १९५७ साली ब्रिटनकडून खरेदी करण्यात आले. चार वर्षांनंतर विक्रांतला नौसेनेत दाखल करण्यात आले होते. मात्र, या भव्य जहाजाचे आयुर्मान घटल्याने ही युध्दनौका आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ६० करोड रूपयात भंगारात देण्यात आली.पर्यटनदृष्ट्या जहाजाची जोपासना करण्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असल्याने शेवटी या ऐतिहासिक जहाजाची विल्हेवाट लावण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. अनेकांनी या जहाजाचे केवळ नाव ऐकले आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणी पाहिलेले नाही. विक्रांत नौका पाहणाऱ्यांंच्या डोळ्यांचे पारणे फिटावे, असे या जहाजाचे रूप होते. यामुळे लोकांना विक्रांतची कारकीर्द व इतिहास कळावा, या हेतूने मुकादम यांनी जहाजाची प्रतिकृती बनवली आहे. यापूर्वी मुकादम यांनी अंड्यांचा कुतूबमिनार शाळेला भेट दिला होता.मुंबई पोर्ट ट्र्रस्टमधील डेजर विवेक जहाजावरील सेवानिवृत्त कॅप्टन हमीद मुकादम यांनी विक्रांतची बनवली साडेपाच फुटाची प्रतिकृती.प्रजासत्ताक दिनी विक्रांत येथील जिल्हा परिषद ऊर्दू शाळेला भेट स्वरूपात देणार.सन १९६५ व १९७१ साली पाकिस्तान लढाई व गोवा मुक्ती संग्रामात विक्रांतने बजावली महत्त्वाची कामगिरी.