शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

राहुल गांधी 'या' प्रश्नांची उत्तरे देणार का?, खासदार धनंजय महाडिक यांचा सवाल

By समीर देशपांडे | Updated: October 4, 2024 12:22 IST

कोल्हापूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज, शुक्रवारपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेसने हा दौरा ...

कोल्हापूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज, शुक्रवारपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेसने हा दौरा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दरम्यानच, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र या दौऱ्यावर येणाऱ्या गांधी यांच्याविरोधात निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. महाडिक यांनी तर शाहू महाराजांच्या नगरीत आम्ही त्यांचे स्वागत करतो पण शिवपुतळा अनावरण करण्यासाठी येणारे गांधी आमच्या प्रश्नांची उत्तरे देणार का अशी विचारणा केली आहे.हे विचारले प्रश्न

  • हिंदू धर्माची, संस्कृतीची निंदा नालस्ती आणि टिंगल करणाऱ्या, देशाचे तुकडे तुकडे करणाऱ्या गॅंगसाठी राहुल गांधी आदर्श आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आणि हिंदू धर्म रक्षणासाठी औरंगजेब, आदिलशाही, मोगलशाही यासारख्या हिंदू धर्मावर चालून आलेल्या आक्रमकांना धडा शिकवला. पुरोगामित्वाच्या नावाखाली, हिंदू धर्माची कुचेष्टा आणि अवमान होऊ देणार नाही हे राहुल गांधी यांना मान्य आहे का ?
  • अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात नाच गाणी करण्यात आली, असा तद्दन घाणेरडा आणि खोटा आरोप राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेत केला होता. त्याबद्दल राहुल गांधी समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागण्यास तयार आहेत का ?
  • लोकसभेत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी, हिंदू म्हणजे असत्य, हिंदू म्हणजे हिंसा अशी विधाने केली होती. हिंदू धर्माचा इतका द्वेष करणाऱ्या राहुल गांधी यांना, हिंदू समाजाचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण करण्याची खरोखर इच्छा आहे का ? की केवळ राजकारणासाठी राहुल गांधी हे ढोंग करत आहेत?
  • स्वामी समर्थांचा अपमान करणाऱ्यांना माफी मागायला लावणार का?
  • केवळ मतांसाठी विशाळगडावरील अतिक्रमणे पाडण्यास विरोध करणाऱ्यांना ते माफी मागायला लावणार का?
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRahul Gandhiराहुल गांधीDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक