शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेणार नाही; देणारही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 11:55 IST

दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अंतर्गत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सत्यनिष्ठा प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘लाच घेणार नाही आणि देणार नाही,’ अशी शपथ दिली.

ठळक मुद्देलाच घेणार नाही; देणारही नाहीजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

कोल्हापूर : दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अंतर्गत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सत्यनिष्ठा प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘लाच घेणार नाही आणि देणार नाही,’ अशी शपथ दिली.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, आपल्या देशाची आर्थिक, राजनैतिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा मोठा अडथळा आहे. या भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सर्व संबंधित पक्ष जसे की सरकार, नागरिक आणि खासगी क्षेत्र यांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे.

प्रत्येक नागरिकाने सावध राहायला पाहिजे. नेहमी प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठा यांच्या उच्चतम मानकाबाबत वचनबद्ध असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात साथ द्यायला पाहिजे. ही शपथ केवळ घेण्यापुरतीच नसून ती सर्वांनी पाळावयाची आहे, असेही ते म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, महसूल तहसीलदार सुनीता नेर्लीकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, आदी उपस्थित होते.

शपथजीवनाच्या सर्व क्षेत्रांत सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करीन. लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही. सर्व कार्ये प्रामाणिक आणि पारदर्शीपणे करीन. जनहितामध्ये कार्य करीन. व्यक्तिगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करीन. भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईन. 

 

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर